सावनेरात रंगला तनिष्का जल्लोष

छायाचित्र
छायाचित्र

सावनेर : सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली. सावित्रीबाईंच्या या महान कार्यामुळेच आज महिलांमध्ये समाज बदलण्याची व प्रगतीकडे नेण्याची शक्‍ती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचे शिक्षणविषयक विचार आणखी प्रबळ करायला हवेत. कारण क्रांती ही शस्त्राने नव्हे तर विचारांच्या माध्यमातून होते, असे प्रतिपादन सावनेरचे आमदार सुनील केदार यांनी केले.

रविवारी सावनेर येथे सकाळ तनिष्का व्यासपीठाच्या "जल्लोष' व बचतगट महिला मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार केदार मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी केले. व्यासपीठावर मोहपाच्या नगराध्यक्ष शोभा कऊटकर, सरस्वती महाविद्यालयाच्या प्राचार्य लता वाघ, विदर्भातील पहिल्या महिला बांधकाम व्यावसायिक रिता पोटफुसे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सुषमा भड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या डॉ. पौर्णिमा केदार-चिंचमलातपुरे, श्रीमती अनुजा केदार, सकाळ नागपूर आवृतीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे उपस्थित होते.
तनिष्का व्यासपीठाचे आभार व्यक्त करीत आमदार सुनील केदार यांनी महिलांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. आमदार केदार म्हणाले, महिलांनी काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम होण्याची संधी आहे. महिला शिक्षित झाल्याने त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. खरे-खोटे, चूक-बरोबर, न्याय-अन्याय याबद्दल जागृती निर्माण झाली आहे. यामुळे त्यांना प्रगतीपासून कुणीही थांबवू शकत नाही. प्रत्येक महिलेने "मै कभी हार नही सकती' या प्रेरणेतून काम केले पाहिजे.
शिवाली देशपांडे यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शैलेश पांडे यांनी तर संचालन कोकिळा कोदनकर यांनी केले. आभार मनीषा खापरे यांनी मानले.
यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिला व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम तनिष्का व्यासपीठाच्या सदस्यांनी सादर केले. तनिष्का गटाने तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातून तनिष्का गटाच्या सदस्य तथा बचतगटाच्या महिलांनी मोठ्या संख्यने हजेरी लावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com