शिक्षकाचा शाळेत आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

तुमसर (जि. भंडारा) : शाळेत होणारा मानसिक त्रास व अपमानास्पद वागणुकीला कंटाळून जनता विद्यालयातील एका सहाय्यक शिक्षकाने शुक्रवारी सकाळी 11 वाजता स्टाफ रूममध्ये अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, सहकारी शिक्षक धावून आल्याने त्याचे प्राण वाचले.
अनिल पतीराम मेश्राम (वय 42, रा. इंदोरा, नागपूर) असे या शिक्षकाचे नाव आहे.

येथील जनता विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अनिल मेश्राम शुक्रवारी (ता. 10) सकाळी 11 वाजता शिक्षकांच्या बैठक खोलीत दाखल झाले. त्यानंतर शाळेत मला मानसिक, आर्थिक त्रास देऊन अपमानास्पद वागणूक देतात, असे म्हणून पेट्रोल भरलेली बॉटल काढली. स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावण्यास माचिस काढली. इतक्‍यात सहकारी शिक्षकांनी त्यांचा हात पकडून त्यांना शांत बसविले. मुख्याध्यापकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सदर सहाय्यक शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी या शिक्षकाने लिहून ठेवलेल्या तक्रारीत मानसिक, आर्थिक व अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्याला शाळेचे मुख्याध्यापक व तत्कालीन मुख्याध्यापक जबाबदार आहेत. त्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांसमोर आत्मदहन करत असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: teacher attempted suicide at school