शिक्षकांवर अतिरिक्त होण्याचे संकट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

नागपूर - केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावीसाठी गतवर्षीपासून ऑनलाइन प्रवेश  प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील ५४ हजार जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत केवळ ३४ हजारांवर अर्ज आलेत. नागपूर महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांच्या वीस हजारांवर जागा रिक्‍त राहण्याची शक्‍यता असून त्यामुळे काही नामवंत महाविद्यालये वगळता अन्य महाविद्यालयांवर अतिरित शिक्षकांचे संकट ओढावणार असल्याचे चित्र आहे. 

इंग्रजी माध्यमामुळे प्राथमिक आणि माध्यमिकच्या शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली. यामुळे दरवर्षी शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याचे दिसते. हेच चित्र आता कनिष्ठ महाविद्यालयांतही दिसायला मिळणार आहे. क्‍लासेसशी टाय-अपमुळे ठरावीक महाविद्यालयात  मुले प्रवेश घेताना दिसून येतात. या प्रकाराने इतर महाविद्यालयातील निम्म्या जागाही भरत नसल्याचे दिसून येते. यावर्षीही कला, वाणिज्य, विज्ञान आणि द्विलक्षीच्या ५४ हजार १२० जागांसाठी करण्यात आलेल्या अर्ज नोंदणीत ३४ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. 

यातूनच वीस हजारांवर जागा अगोदरच रिक्त राहणार असल्याचे चित्र आहे. या प्रकाराने ज्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही, त्यातील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची चिन्हे आहे. द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी साडेचार हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ८ हजारांवर जागा आहेत.  सध्या या अभ्यासक्रमातील प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. मात्र, नामवंत महाविद्यालये वगळल्यास आलेले अर्ज आणि त्यातून झालेल्या प्रवेशाचा आकडा लक्षात घेता, जवळपास २२  हजार जागा रिक्त राहणार असल्याचे दिसते. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा संभाव्य धोका वर्तविला जात आहे.

दुसऱ्या यादीत ७४८ प्रवेश
शिक्षण विभागातर्फे गुरुवारी (ता.२८) द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या उर्वरित जागांसाठी प्रवेशाची दुसरी यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीमध्ये पहिल्या दिवशी ७४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यापूर्वी पहिल्या यादीतील १ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांत प्रवेश घेतले आहे. त्यानुसार आता २ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतले असून उद्या शुक्रवार (ता.२९) प्रवेशाचा शेवटचा दिवस आहे. यानंतर द्विलक्षी अभ्यासक्रमाची प्रवेशफेरी संपणार आहे.

Web Title: teacher disaster