आंतरजिल्हा बदलीस पात्र शिक्षकांची फरपट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

भंडारा - भंडारा जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांची १२४ पदे रिक्त असताना फक्त दोनच पदे शासनस्तरावर भरल्याने बदलीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांची फरपट सुरू आहे. आंतरजिल्हा बदलीद्वारे येणाऱ्या शिक्षकांना विशेष बाब म्हणून पदस्थापना दिली जावी, अशी मागणी शिक्षकांची आहे.

भंडारा - भंडारा जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांची १२४ पदे रिक्त असताना फक्त दोनच पदे शासनस्तरावर भरल्याने बदलीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांची फरपट सुरू आहे. आंतरजिल्हा बदलीद्वारे येणाऱ्या शिक्षकांना विशेष बाब म्हणून पदस्थापना दिली जावी, अशी मागणी शिक्षकांची आहे.

२३ नोव्हेंबर २०१६ ला भंडारा जिल्हा परिषदेने ११७ प्राथमिक शिक्षकांना नियमबाह्यरीत्या आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिली. याबाबत अनेक तक्रारी शासनदरबारी झाल्या. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात यासंदर्भात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. विभागीय आयुक्त नागपूर, तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष चौकशी समिती नेमली. समितीच्या तपासात अनेक गंभीर बाबी समोर आल्याने या बदल्या रद्द करण्यात आल्या. परंतु, राजकीय दबावमुळे अद्याप ११७ प्राथमिक शिक्षकांना भंडारा जिल्हा परिषदेतून भारमुक्त करण्यात आले नाही. या शिक्षकांमुळे बदलीसाठी खऱ्या अर्थाने पात्र असणाऱ्या शिक्षकांना स्वजिल्ह्यात येण्यापासून वंचित राहावे लागत आहे. २०१७ पासून शासनाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचे धोरण स्वीकारले आहे. 

१२४ रिक्तपदे; भरली दोन!
भंडारा जिल्हा परिषदेत ऑनलाइनच्या दुसरा टप्पा ८ मे ते ३१ मेपर्यंत संभाव्य ९६ पदे रिक्त आहेत. परंतु, फक्त दोन पदे भरण्यात आली. २८ प्राथमिक शिक्षकांची भंडारा जि. प.मधून अन्य जिल्ह्यांत बदली झाली. दोन्ही मिळून १२४ पदे रिक्त असताना फक्त दोनच पदे शासनस्तरावर भरली.

 भंडारा जिल्हा परिषदेला बदलून येऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होत आहे. विशेष बाब म्हणून प्राथमिक शिक्षकांच्या त्वरित बदल्यांवर शासनस्तरावर निर्णय घ्यावा यासाठी २५ मेपर्यंत मुदत दिली होती. 
- शशिकांत वसू, प्रहार शिक्षक संघटना, भंडारा

Web Title: teacher interdistrict transfer