शिक्षकांचे पगार होणार ऑफलाइन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

नागपूर - राज्यातील सर्वच शिक्षकांचे पगार ऑनलाइन करण्यासाठी शिक्षण विभागाकडून शालार्थ प्रणाली विकसित करण्यात आली. मात्र, गेल्या वर्षभरापासून या प्रणालीमध्ये तांत्रिक दोष येत असल्याने अद्याप ती पूर्वपदावर आलेली नाही. यातूनच जानेवारीपासून शिक्षकांचे वेतन ऑफलाइन करण्यात येत आहे. आता मे, जून आणि जुलै महिन्यांचेही पगार ऑफलाइन करण्यात येणार आहे. 

दोन वर्षांपूर्वी शिक्षकांचे वेतन ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यानुसार, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना त्यांची माहिती शालार्थप्रणालीमध्ये भरण्यास सांगण्यात आले. मात्र, यामध्ये समायोजन झालेल्या शिक्षकांची माहिती नसल्याने बऱ्याच प्रमाणात समायोजित शिक्षकांना पगारापासून वंचित राहावे लागले. मात्र, गेल्या जानेवारी महिन्यापासून शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शालार्थ क्रमांक मिळालेल्या परंतु, ऑनलाइन वेतन न मिळालेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या थकीत व नियमित वेतनाचा प्रश्नही ऐरणीवर आहे. त्यामुळे विरोधात राज्यातील सर्वच शिक्षक संघटनांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे यासाठी शिक्षक संघटनांनी उपसंचालक ते शिक्षणमंत्र्यांना वारंवार निवेदन सादर केले. त्यावर शिक्षण विभागाने 18 मे रोजी शासन निर्णय काढून जुलैपर्यंतचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार ऑफलाइन पद्धतीने वितरित करण्यास मान्यता दिली. 

"एक तारखेला पगार मिळावा' 
प्रत्येक महिन्याचे वेतन एक तारखेलाच वितरित करावे, तसेच वेतन वितरित करण्यास विलंब झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक आमदार नागोराव गाणार यांनी केली आहे. याशिवाय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन हे ऑनलाइन असल्यामुळे वेतनाची मोठी समस्या निर्माण झाली होती. यापुढेही पगार ऑफलाइन करण्याची मागणी केली आहे. 

राज्यातील शिक्षक - 5 लाख 
शिक्षकेतर कर्मचारी - 1 लाख 

Web Title: Teacher salaries offline