अत्याचारप्रकरणी शिक्षकाला दहा वर्षे शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

यवतमाळ : तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या शिक्षकास दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल सोमवारी (ता. 26) येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-एक तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी दिला.

माधव संभूजी मरापे (वय 35, रा. केळापूर, रेणापूर, ता. घाटंजी) असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षकाने तरुणीला लग्न करण्याचे आश्‍वासन दाखवून तीन ते चार वर्षे अत्याचार केला. मात्र, लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी पीडितेने घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक आर. आर. येडमे यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडित, साक्षीदार, तपास अधिकारी व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानून शिक्षा सुनावण्यात आली. भादंवि 376 नुसार दहा वर्षे सश्रम कारावास व 50 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे कारावास, भादंवि 417 नुसार एक वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंड, पीडितेला 50 हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आलेत. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नरेंद्र पांडे यांनी बाजू मांडली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher sentenced to ten years for torture