शिक्षिकेची मुलासह विहिरीत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

आमगाव (जि. गोंदिया) - होळीनिमित्त माहेरी आलेल्या शिक्षिकेने मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना तिगाव येथे बुधवारी (ता. १५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. नूतन नितीन वालदे (वय ३८) व सौम्य नितीन वालदे (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. नूतन ही रामटेक तालुक्‍यातील (जि. नागपूर) देवलापार येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होती. 

रामटेक येथे वास्तव्यास असलेली नूतन ही मुलगा सौम्य व मुलीसह होळीनिमित्त तिगाव येथे आली होती. नत्थू टेंभूर्णे यांची ती मुलगी आहे. गुरुवारी सकाळी नूतन व सौम्य घरी दिसले नाही. त्यामुळे टेंभूर्णे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, घरासमोरील विहिरीत नूतन व सौम्यचे मृतदेह तरंगताना आढळले. घटनास्थळीच मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी आढळली. त्यात स्वेच्छेने आत्महत्या करीत असल्याचे नमूद करून त्रास असल्याचा उल्लेख आहे. 

परंतु, कोणता त्रास हा उल्लेख नसल्याने आत्महत्येचे गूढ कायम आहे. उल्लेखनीय म्हणजे, नूतन ही मुलांसह १६ मार्च रोजी परत रामटेकला जाणार होती, अशी माहिती आहे. नूतनचे पती नितीन हेदेखील शिक्षक आहेत. आमगाव पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. तपास सुरू आहे.

रामटेक (जि. नागपूर) - शिक्षिकेचा पती नितीन वालदे हा रामटेक तालुक्‍यातीलच दाहोदा येथील आश्रमशाळेत शिक्षक आहे. तो नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांचे आपसातील संबंध तणावपूर्ण होते, असे कळते. या कारणावरून त्यांच्यात नेहमी भांडण होत असे. प्रसंगी नितीन तिला मारहाणही करायचा. याच जाचाला कंटाळून तिने आपली जीवनयात्रा संपविली असावी, असा अंदाज येथे व्यक्त करण्यात येत आहे. रामटेकला लागून असलेल्या शीतलवाडी परिसरात हे दाम्पत्य स्वतःच्या घरात राहत होते. होळीच्या निमित्ताने शिक्षिका माहेरी तिगाव येथे गेली होती. घटनेच्या पूर्वी तिचे पतीशी भ्रमणध्वनीवरून भांडण झाले, अशीही चर्चा आहे.

Web Title: teacher suicide with child