शिक्षकाची विष घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

कळमेश्वर - बॅंकेत जात असल्याचे सांगून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचा रविवारी मृतदेह आढळला. त्याच्याजवळ आढळलेल्या विषारी औषधावरून त्याने विष घेऊन जीवन संपविल्याची घटना चौदामैल परिसरात उघडकीस आली. 

कळमेश्वर - बॅंकेत जात असल्याचे सांगून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचा रविवारी मृतदेह आढळला. त्याच्याजवळ आढळलेल्या विषारी औषधावरून त्याने विष घेऊन जीवन संपविल्याची घटना चौदामैल परिसरात उघडकीस आली. 

जीवन हरीभाऊ गोंडाणे (वय ५२, जुनोना(फुके), ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. ते कोंढाळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत होते. गुरुवारी (ता. २४) दुपारी काटोल येथील एफडीआय बॅंकेत काही कामानिमित्त जात असल्याचे सांगून ते घरून निघून गेले. मात्र, रात्र झाल्यानंतरसुद्धा ते परत न आल्याने त्यांचा इतरत्र शोध घेण्यात आला. शेवटी पत्नी अंजुबाईने तिचा भाऊ दिनेश बंसोड याला घेऊन कोंढाळी व अंबाझरी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तीन दिवस नागपूर व कोंढाळी पोलिसांचा शोध सुरू असताना शनिवारी दुपारच्या सुमारास अमरावती-नागपूर महामार्गावरील चौदामैल शिवारात स्थानिक नागरिकांना त्यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती कळमेश्वर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश उईके, पुष्पपाल आकरे, ईश्वर धुर्वे, भोजराज तांदुळकर, तुषार खडके घटनास्थळी दाखल झाले. 

जवळ आढळले विष
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पंचनाम्यामध्ये मृताच्या शेजारी पाण्याच्या बाटलीमध्ये ‘रोगर’ नामक विष आढळले. त्यामुळे जीवनने हेच औषध घेऊन जीवनयात्रा संपविली असावी, असा कयास लावण्यात येत आहे  कळमेश्वर पोलिसांनी जीवनचा मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

Web Title: teacher suicide poison