दिव्यांग विद्यार्थिनीला शरीरसुखाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

गोंदिया : गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आमगाव तालुक्‍यातील बोरकन्हार येथे बुधवारी (ता. 17) उघडकीस आली. एका दिव्यांग विद्यार्थिनीला भ्रमणध्वनीवर वारंवार संदेश पाठवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. शाळेत विद्यार्थिनी सुरक्षित नसल्याचे पुन्हा या घटनेवरून वाटू लागले आहे.

आमगाव तालुक्‍याच्या ठाणा येथील 17 वर्षीय दिव्यांग मुलगी गुणवंत असल्याने तिचा सत्कार आमगाव येथे 26 जानेवारी रोजी करण्यात आला. ती सत्काराकरिता गेली असता बोरकन्हार येथील युवकाने तिचे कौतुक करत अभिनंदन केले. यातून त्या दोघांची चांगली ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्या युवकाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याची माहिती जिल्हा परिषदेच्या आमगाव येथील बीआरसीमध्ये अपंग समावेशित विभागात कार्यरत शिक्षकाला (वय 30, रा. भंडारा) कळली. त्याने त्या मुलीच्या मोबाईलवर वारंवार संदेश पाठवून शरीरसुखाची मागणी केली. एवढेच नव्हे, तर तिचा अनेकदा पाठलागदेखील केला. दरम्यान, मुलीने या प्रकाराला कंटाळून अखेर आमगाव पोलिस ठाण्यात बुधवारी बोरकन्हार येथील युवक आणि शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. आमगाव पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher tried to molest handicaffed student