देसाईगंजच्या हनुमान वाडांत शिक्षकाचा खुन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

राजाराम परशुरामकर हे घरी एकटेच असताना त्यांचा घरात घुसून खुन करण्यात आला असून पैकी एका आरोपीला मृतकाच्या मुलीने ओळखले आहे.

देसाईगंज - येथील हनुमान वाडांत वास्तव्यास असलेल्या राजाराम परशुरामकर या 54 वषींय शिक्षकाचा घरात घुसून खुन करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे.

परशुरामकर यांचा मुलगा नागपूर येथील दवाखान्यातून उपचार घेऊन नुकताच घरी पोहचला असता आरोपींना घरातून पळताना पाहुन त्यांची भांबेरी उडाली होती. दरम्यान राजाराम परशुरामकर हे घरी एकटेच असताना त्यांचा घरात घुसून खुन करण्यात आला असून पैकी एका आरोपीला मृतकाच्या मुलीने ओळखले आहे. दरम्यान देसाईगंज पोलिसांना घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठुन मुलीच्या बयानावरुन सदर आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. खुन करण्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसुन परशुरामकर हे कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे शिक्षक या पदावर कार्यरत होते.

काहीच दिवसापुवीं मुलाची तब्येत बिघडल्याने नागपुर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असता कुटुंब त्याच्या सोबतीला असल्याने ते घरी एकटेच राहत होते. आज अचानक परीवार घरी पाय का ठेवत नाहीत तोच घरातून काही ईसम पळून जात असल्याचे पाहताच घरात झाकून चौकशी केली असता परशुरामकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. दरम्यान पळून जाणाऱ्यापैकी एका ईसमाला मुलीने ओळखले असल्याने सदर ईसमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सिद्धानंद मांडवकर यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज पोलिस करीत आहेत.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Teachers Murder in Desaiganj Gadchiroli