Video : विद्यार्थी आहेत की गुरंढोरं 

नीलेश झाडे 
सोमवार, 16 डिसेंबर 2019

क्रीडा स्पर्धेला गेलेल्या चिमुकल्या पन्नास विद्यार्थ्यांना चक्क टेंपोत कोंबून आणल्या गेले. टेंपोचा पायदान्यावर लोंबकळत चिमुकल्यांनी प्रवास केला. चंद्रपूर जिल्ह्यातील गोजोली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हा जिवघेणा प्रकार घडला आहे. 

धाबा (जि. चंद्रपूर) : आई-वडील आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडविण्यासाठी सतत धडपडत असतात. आपला पाल्य उच्च शिक्षित व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असते. त्याला चांगल्या गोष्टी समजावून सांगितले जातात आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचा दम दिला जातो. कुणाशी कसे वागावे, चांगल्या गोष्टी कशा आत्मसात कराव्या यासाठी वेळोवेळी शिक्षण देत असतात. मात्र, ते कुठेना कुठे कमी पडतात. 

बापरे! -  मातेने दिला पावणेपाच किलो वजनाच्या बाळाला जन्म

यामुळेच योग्य संस्कार घडविण्यासाठी पालक आपल्या पाल्यांना शाळेत टाकतात. आई-वडिलानंतर मुलांवर योग्य संस्कार घडविण्याचे काम शिक्षकच करीत असतात. म्हणून शिक्षकांना गुरूचे स्थान देण्यात आले आहे. शिक्षकही आपल्या मुलाप्रमाणेच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडविण्याचे काम करीत असतात. आपला विद्यार्थी चांगला शिकावा आणि मोठा अधिकारी व्हावा यासाठी ते प्रयत्न करतात. कारण, आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे, असे म्हटले जाते. मात्र, विद्यादानाचे काम करणारे शिक्षकच विद्यार्थ्यांच्या जिवावर उठल्याचे चंद्रपुरातील घटनेवरून पुढे आले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्‍यातून गुरुजींच्या विविध करामती पुढे येत आहेत. कर्तव्यावर असलेले भंगारपेठ येथील शिक्षकाने फुल्ल दारू ढोसली अन्‌ शाळेलगत असलेल्या शेतात लोळांगण घातले. याला दोन ते तीन दिवस उलटले असतानाच धामणगाव येथील क्रीडा स्पर्धेत वांदग घडले होते. आता गोजोली येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने चिमुकल्या पन्नास विद्यार्थ्यांना चक्क टेंपोत कोंबून नेल्याचा संतापदायक प्रकार समोर आला आहे. 

हेही वाचा -  अबब! प्रतिष्ठित व्यक्ती कुंटणखान्याचे ग्राहक

गोंडपिपरी तालुक्‍यातील सकमूर येथे जिल्हा परिषद शाळांची बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा आटोपल्या. या स्पर्धेत गोजोली येथील जिल्हा परिषद शाळेतील 
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विध्यार्थ्यांना गावाकडे घेऊन जाण्यासाठी गोजोली येथील शिक्षकाने टेंपो गाडी केली. या गाडीत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पन्नास चिमुकल्या विध्यार्थांना कोंबले गेले. गाडीत उभे राहण्यापुरतीही जागा नव्हती. काही विद्यार्थ्यांनी टेंपोच्या पायदानावर उभे राहून प्रवास केला. 

Image may contain: sky, outdoor and nature
Caption

मला कहीही माहिती नाही

क्रीड स्पर्धा आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांना टेम्पोप बसविण्यात आले. विद्यार्थी लोंबकळत प्रवास करीत असताना गुरुजी मात्र दुचाकीने निघाले. या प्रकाराने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत केंद्रप्रमुख काळे यांना विचारणा केली असता या प्रकाराबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. 

आम्ही केवळ वीस विद्यार्थ्यांना बसविले
तीन दिवसांपासून विद्यार्थी सकमूरला होते. विद्यार्थ्यांना नेण्यासाठी सांगितलेले वेळेवर वाहन आले नाही. तसेच बस आणि इतर वाहन वेळेवर मिळाले नाही. त्याचवेळी गोजोली येथील टेंपो आला. आम्ही केवळ वीस विद्यार्थ्यांना टेंपोत बसविले. मात्र, घराकडे जाण्याची घाई असल्याने उर्वरित विद्यार्थीही टेंपोत बसले. दुचाकीवरही विद्यार्थी होते. टेंपोच्या मागेच आम्ही होतो. 
- डी. बी. गोंगले, 
मुख्याध्यापक, गोजोली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers play with students' lives