विद्यार्थीनींनी घडविले तंत्रप्रदर्शनातून कौशल्याचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 December 2019

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये संस्थेच्या दहा शाखेतून ३७ मॉडेल्स सादर करण्यात आली.

अकोला : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये संस्थेच्या दहा शाखेतून ३७ मॉडेल्स सादर करण्यात आली. प्रदर्शनाचे उद्‍घाटण आयएमसी ऑफ आयटीआयचे अध्यक्ष तथा प्रख्यात उद्योजक जयंत पडगिलवार यांनी केले. या प्रसंगी प्रमुख अथिती म्हणून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रकाश जयस्वाल तसेच अकोला इंडस्ट्रीज असोशियनचे उपाध्यक्ष मनोज खंडेलवाल, उद्योजक अमित पारवे, शासकीय तंत्र माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील हे उपस्थित होते. या प्रंसगी पाहण्याचे स्वागत संस्थेचे प्राचार्य प्रमोद भंडारे यांनी केले.

कौशल्य विभागाने या वर्षीपासून महाराष्ट्रातील सर्वच औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये तंत्र प्रदर्शनीचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला आहे. प्रशिक्षणार्थ्यांमध्ये असलेल्या कौशल्याचे दर्शन व्हावे व यातून प्रशिक्षणार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष तंत्र कौशल्याचा वापर करण्याचे गुण यावेत या उदात्त हेतूने हे प्रदर्शनी आयोजिल्या गेल्या आहेत.

हेही वाचा - अबब...वीज चोरीचे अजबगजब फंडे

Image may contain: 12 people, people smiling, people standing and people sitting

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोला ही संस्था पुर्वीपासून अशा उपक्रमांना सातत्याने राबविण्याचा प्रयत्न करीत आली असून याही प्रदर्शनीमध्ये संस्थेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मेक्यॉनिक, आयसीटीएसएम, कोपा, इंटेरिअर डिझाइन अॅन्ड डेकोरेशन, सेक्रेटरी प्रॅक्टीस, बेसिक कॉसमेटालॉजी, फूड अॅन्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, बेकर अॅण्ड कन्फेशनर, फॅशन डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी, ड्रेसमेकींग इत्यादी व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थी मुलींनी आपआपल्या व्यवसाय संदर्भातील कौशल्याचा समावेश असलेल्या तंत्राचा वापर करून विविध मॉडल्सची निर्मिती या प्रदर्शनीत मांडली होती.

Image may contain: 3 people, people sitting, child and indoor

सर्वच विभागामधून या प्रदर्शनीत एकूण ३७ मॉडेल्सची मांडणी करण्यात आली होती. या पैकी अभियांत्रीकी गटामधून इलेक्ट्रॉनिक्स मेक्यानिक या व्यवसायाच्या स्मॉर्ट होम या प्रतीकृतीला प्रथम, आयसीटीएसएम या व्यवसायाच्या इन्फो व्हिडीओ या प्रकल्पाला द्वितीय तर इंटेरिअर डिझाइन अॅन्ड डेकोरेशन या व्यवसायाच्या बिल्डीग मॉडेल इन्टेरीअर फर्निचर याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला तर बिगर अभियांत्रीकी गटामधून फॅशन डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी या व्यवसायाच्या एलईडी ड्रेस या प्रतीकृतीला प्रथम, ड्रेसमेकींग या व्यवसायाच्या जीन्स रिसायकल या प्रकल्पाला द्वितीय तर बेकर अॅण्ड कन्फेशनर या व्यवसायाच्या बाजरीच बिस्किट व कोपा व्यवसायाच्या मोबाईल स्क्रिन शेअरींग या मॉडलला विभागून तृतीय क्रमांक घोषीत करण्यात आला.

Image may contain: 4 people, people sitting, food and indoor

या प्रदर्शनाला यशस्वीने करीता संस्थेतील सर्व शिल्प निदेशक वृद, प्रशिक्षणार्थीनी, कर्मचारी वर्गासह संस्थेच्या गटनिदेशिका रेखा रोडगे यांनी अथक परीश्रम घेतले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: techno exhibition at iti akola