हिस्ट्रोस्कोपी तंत्रज्ञान वंध्यत्वावर वरदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नागपूर - गर्भातील गाठींच्या निदानासह वंधत्वावरील उपचारात हिस्ट्रोस्कोपी वरदान ठरत आहे, असा सूर "हिस्ट्रोस्कोपी कार्निव्हल-युटेरस इन फोकस' वैद्यकशास्त्रज्ञांच्या परिषदेत आयोजित चर्चासत्रातून पुढे आला.

रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे सेंट्रल इंडिया टेस्टट्यूब बेबी सेंटर अकादमी ऑफ कार्निव्हल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिषद घेण्यात आली. "हिस्ट्रोस्कोपी कार्निव्हल-युटेरस इन फोकस' हा विषय होता. डॉ. कादंबरी बलकवडे, बालाघाट येथील जैन समूहाचे संचालक त्रिलोकचंद कोचर, डॉ. सुषमा देशमुख यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले.

इजिप्त येथील हिस्ट्रोस्कोपीतज्ज्ञ डॉ. ओसामा शावकी यांनी गर्भपिशवीतील गाठींचे निदान करण्यापासून तर गर्भपिशवीतील आजारांच्या अचूक निदानासाठी हिस्ट्रोस्कोपी तंत्रज्ञान वरदान असल्याचे सांगितले. हिस्ट्रोस्कोपी दुर्बीणद्वारे केला जाणारा शस्त्रक्रियेचा प्रकार आहे. यात महिलांच्या गर्भपिशवीतील आजारांचे निदान सहज करता येते. मासिक पाळीतील अनियमिततेपासून तर वंध्यत्वावरील उपचारात ही प्रक्रिया प्रभावी ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रकारात टाका लावला जात नाही. गर्भाशयाशी संबंधित कोणताही आजार झाला, तर गर्भाशय काढून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आता दुर्बीणीच्या माध्यमातून गर्भाशयाचा नेमका विकार समजून उपचार करणे सोपे झाले आहे. हिस्ट्रोस्कोपी तंत्रामुळे वंध्यत्व, वारंवार गर्भपात, गर्भाशयात पडदा, अनैसर्गिक रक्तस्रावसारख्या समस्या असणाऱ्या महिलांना फायदा होत असल्याचे इजिप्तचे डॉ. ओसामा शावकी, स्पेनचे डॉ. सर्जिओ हायमोवीच आणि डॉ. लुईस अलोन्सो तर अमेरिकेतील डॉ. जोस कारुन्गो यांनी सांगितले. परिषदेला देश-विदेशांतील तीनशे प्रतिनिधी उपस्थित होते. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी थेट शस्त्रक्रियेच्या प्रक्षेपणासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. यात 17 महिलांची शस्त्रक्रिया केली गेली. आयोजनासाठी डॉ. सुषमा देशमुख यांच्यासह डॉ. अनुराधा रिधोरकर, डॉ. सुधीर देशमुख, डॉ. उज्ज्वला केदारे, डॉ. अलका मुखर्जी, डॉ. शिल्पी सूद आणि डॉ. क्षमा केदार यांनी सहकार्य केले.

Web Title: Technology boon to histroskopi infertility

टॅग्स