वाघाच्या 3 दातांसह 8 नखे जप्त 

tiger
tiger

अमरावती : वाघांच्या दातांसह, नखे व इतर अवयवांची तस्करी करणारी टोळी वनविभागाच्या हाती लागली आहे. मुख्य सूत्रधारासह सहा जणांना वनविभागाच्या पथकाने अटक केली. त्या सर्वांना न्यायालयाने मंगळवार(ता. 15)पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

बशीर शहा (रा. धामणगावगढी), राजेश संतोष जामकर, सुनील बाबू बेलसरे (दोघेही रा. मरीयमपूर, चिखलदरा), सुरेंद्र मुकुट बेलसरे, सुरेश बाबूलाल जावरकर (दोघेही रा. मेमना) सह चिखलदऱ्यातील अन्य एका व्यक्तीला अटक झाली. राजेश व सुनील या दोघांकडून वाघांची आठ नखे व तीन दात, तर, सुरेंद्र व सुरेश यांच्याकडून दुसऱ्या वन्यप्राण्यांची कातडी, हाडे जप्त करण्यात आली. 

पूर्व मेळघाट चिखलदरा येथील सहायक वनसंरक्षक अशोक पराड यांच्या पथकाने गुरुवारी (ता. दहा) ही कारवाई केली. ही स्थानिक मंडळी वन्यप्राण्यांच्या शिकारीनंतर त्याचे अवयव काढून, विल्हेवाट लावण्यासाठी मुख्य सूत्रधार बशीर शहा यांच्याजवळ देत असे. त्यासाठी बशीरकडून त्यांना निर्धारित रक्कम मिळत होती. परतवाडा वनविभागाचे भरारी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पहिल्यांदा चिखलदरा नगरपालिकेसमोरून राजेश व सुनील या दोघांना पकडून, दात व नखे जप्त केली. त्यानंतर वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या कटात सहभागी इतरांची नावे प्राप्त होताच त्यांनाही अटक करून, शुक्रवारी (ता. 11) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सहाही जणांना चार दिवसांच्या वनकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

वाघाच्या शिकारीत स्थानिक 
वाघ, बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवांची तस्करी प्रकरणात स्थानिक आदिवासींची मदत घेतली जाते. कमीवेळेत अधिक पैशाच्या आमिषाला काही जण बळी पडत आहेत. 
वाघाचे जे अवयव जप्त झाले, त्याची शिकार केव्हा झाली. हे अद्याप समजू शकले नाही. 

कोट सुरेंद्र व सुरेश या दोघांकडून अजगर व घोरपडीचे चामडे जप्त केल्याची माहिती आहे. परंतु, हे मांस नेमके कोणत्या प्राण्यांचे याची तपासणी शासकीय प्रयोगशाळेत केल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. 
-अशोक पराड, 
सहायक वनसंरक्षक, पूर्व मेळघाट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com