नूतनीकरण आराखडा मिलिटरीकडे प्रलंबित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

नागपूर - नागपूरकरांसह विदर्भातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराच्या नूतनीकरणाचा आराखडा मंजुरीसाठी डिफेन्सकडे पाठविण्यात आला. मंदिराचे नूतनीकरण व्हावे यासाठी ट्रस्टदेखील तयार असून, तसा प्रस्तावदेखील पारित करण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्टने गुरुवारी (ता. ६) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली.  टेकडी गणेश मंदिराचे नूतनीकरण व्हावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका श्‍याम अग्रवाल यांनी दाखल केली. याप्रकरणी आज न्यायमूर्तिद्वय भूषण गवई आणि विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आज ट्रस्टने शपथपत्र दिले. त्यात मंदिराचा बराचसा भाग जीर्ण झाला आहे.

नागपूर - नागपूरकरांसह विदर्भातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराच्या नूतनीकरणाचा आराखडा मंजुरीसाठी डिफेन्सकडे पाठविण्यात आला. मंदिराचे नूतनीकरण व्हावे यासाठी ट्रस्टदेखील तयार असून, तसा प्रस्तावदेखील पारित करण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्टने गुरुवारी (ता. ६) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली.  टेकडी गणेश मंदिराचे नूतनीकरण व्हावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका श्‍याम अग्रवाल यांनी दाखल केली. याप्रकरणी आज न्यायमूर्तिद्वय भूषण गवई आणि विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आज ट्रस्टने शपथपत्र दिले. त्यात मंदिराचा बराचसा भाग जीर्ण झाला आहे. काही ठिकाणचे बांधकाम ढासळले आहे. यामुळे नूतनीकरण आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे. ट्रस्टने २००४ मध्ये नूतनीकरणाचा प्रस्ताव पारित केला होता. मंदिर मिलिटरीच्या जागेवर असल्यामुळे मिलिटरीकडून नूतनीकरणासाठी कुठल्याची प्रकारची अडचण नसल्याची परवानगी ऑक्‍टोबर २००८ मध्ये मिळविण्यात आली. त्यानुसार ट्रस्टने महापालिकेकडे नवीन आराखड्यासाठी परवानगी मागितली.

महापालिकेने नवीन आराखड्याला नोव्हेंबर २००८ मध्ये मंजुरी दिली. मात्र, अद्याप यावर मिलिटरीकडून उत्तर आलेले नाही. 

ट्रस्टचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने गृह मंत्रालयाला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले. ट्रस्टतर्फे वरिष्ठ अधिवक्ता अनिल मार्डीकर यांनी तर याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. गणेश खानझोडे यांनी बाजू मांडली.

गटबाजीमुळे रखडले नूतनीकरण
मंदिरासाठी खरे असोसिएट्‌स यांनी पिंकस्टोनचा खर्च १५ कोटी रुपये तर पिंकस्टोन विथ मार्बलचा खर्च १० कोटी रुपये लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र, ट्रस्टमध्ये उद्‌भवलेल्या गटबाजीमुळे संपूर्ण निर्माणकार्य रखडले. नूतनीकरणाला विरोध करणाऱ्या गटाने याबाबत धर्मादाय आयुक्‍तांकडे तक्रार केली असता त्यांनी नूतनीकरणाला होकार दिला. परंतु, कामाला गती मिळाली नाही. ३ ऑगस्ट २०१५ रोजी महापालिकेने मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. त्यात पी. टी. मसे असोसिएट्‌स यांनी दिलेल्या अहवालानुसार मंदिराचे नूतनीकरण अत्यंत आवश्‍यक आहे.

Web Title: tekadi ganesh mandir renewal

टॅग्स