दुपारी छत्री आणि पाण्याची बॉटल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

नागपूर - वेळ दुपारी दोनची. स्थळ मानकापूर उड्‌डाणपूल. पारा ४४ पार. ना बसण्याची ना ‘नॅचरल कॉल’ला जाण्याची सोय. उन्हापासून बचाव करण्यासाठी होती फक्‍त एक छत्री अन्‌ पाण्याची बाटली. अशा परिस्थितीत दोन पोलिस कर्मचारी पुलावर नेमून दिलेल्या ‘पॉइंट’वर अतिशय प्रामाणिकपणे आपली ‘ड्यूटी’ करीत होते. काम जबाबदारीचे असल्यामुळे ‘पॉइंट’ही सोडता येत नव्हता. सकाळीपासूनच त्यांची ‘ड्यूटी’ सुरू झाली. ‘काय करणार भाऊ, ड्यूटी फर्स्ट’, अशा शब्दात प्रवीण वाकोडे यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. विपरीत परिस्थितीत कर्तव्य बजावूनही पोलिस कर्मचाऱ्यांची कुणीच फारशी दखल घेत नसल्याची जणू त्यांची तक्रार होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या निमित्ताने सर्वाधिक धावाधाव झाली ती प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांची. दोन दिवस पोलिसांना भरउन्हात ‘ड्यूटी’ करावी लागली.

शांतीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत वाकोडे आणि त्यांचे अन्य एक सहकारी श्‍याम गोरले उड्‌डाणपुलावर कर्तव्यावर होते. आजूबाजूला निवारा नसल्यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. दोन मिनिटे निवांतपणे बसण्यासाठी आजूबाजूला आडोसादेखील नव्हता. अशा स्थितीत पोलिसांना ‘ड्यूटी’ करताना किती त्रास होतो, असा साहजिकच कुणालाही प्रश्‍न पडणार. याबद्दल विचारले असता वाकोडे म्हणाले, पोलिस नेहमीच आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो. अशावेळी ऊन, पाऊस किंवा थंडी कशाचीही पर्वा नसते. आता तर हे ‘रुटिन’च झालंय.

Web Title: temperature increase in nagpur