पुन्हा दोन दिवस उन्हाचे चटके

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

लाट कायम : उपराजधानीतही पारा 45.7 अंशांवर

लाट कायम : उपराजधानीतही पारा 45.7 अंशांवर
नागपूर - गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने त्याचा दैनंदिन कामांवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने विदर्भात पुन्हा दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे पुन्हा दोन दिवस दोन उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे. शनिवारीदेखील विदर्भातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्यावर नोंदविल्या गेले.

उपराजधानीत शनिवारी (ता. 20) 45.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सलग दुसऱ्या दिवशी चंद्रपूर येथे पारा 46 डिग्रीवर गेला होता. वर्धा येथे 45.5 तर ब्रह्मपुरी 44.9 आणि अकोला येथे 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस उष्णलाटेचा इशारा दिल्याने विदर्भवासींना आणखी चटके बसणार आहेत. मे महिना संपत आला तरी पारा कमी न झाल्याने विदर्भवासी यंदा उन्हाच्या तडाख्याने हैराण आहेत. दिवसभर उन्ह आणि सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने वातावरण उष्णदमट होत आहे.

विदर्भातील तापमान अंश सेल्सिअसमध्ये
नागपूर 45.7
अकोला 44.0
अमरावती 41.8
बुलडाणा 40.2
ब्रह्मपुरी 44.9
चंद्रपूर 46.0
गोंदिया 44.8
वर्धा 45.5
वाशीम 42.0
यवतमाळ 43.0

Web Title: temperature in vidarbha