सहा झोपड्यांसह अस्थायी अतिक्रमणांचा सफाया

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

नागपूर - महापालिकेच्या तीन पथकांनी शहरातील विविध भागांत अतिक्रमणविरोधी
कारवाई केली. कारवाईत सहा कच्च्या झोपड्या तोडण्यात आल्या. बॅटसह विविध प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले.

नागपूर - महापालिकेच्या तीन पथकांनी शहरातील विविध भागांत अतिक्रमणविरोधी
कारवाई केली. कारवाईत सहा कच्च्या झोपड्या तोडण्यात आल्या. बॅटसह विविध प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले.

बुधवारी धंतोली, लकडगंज आणि मंगळवारी झोनअंतर्गत अस्थायी अतिक्रमणांचा सफाया केला. दुपारी बारा वाजतादरम्यान धंतोली झोनअंतर्गत रहाटे कॉलोनी चौक परिसरातील फुटपाथला लागून असलेल्या सहा कच्च्या झोपड्या हटविल्या. गेल्या अनेक वर्षांपासून येथे बॅट विक्रेते कुटुंबासह झोपड्यांमध्ये वास्तव्य करीत आहे. त्यांना हटविण्यासाठी नेहमीच महापालिकेतर्फे अतिक्रमणविरोधी कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. पथक गेले की पुन्हा बॅटविक्रेते आपले बस्तान तेथे मांडतात. आजच्या कारवाईत पथकाने सहा झोपड्या हटविल्या. तसेच तेथून बॅट, रीडिंग टेबल, बेताच्या खुर्च्या, बेताचे झुले, तीन टेबल जप्त करण्यात आले.

दुसरी कारवाई मंगळवारी झोनअंतर्गत मानकापूर मार्गावरील स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स येथे करण्यात आली. या मार्गावरील भाजीविक्रेते, फळविक्रेते, फर्निचर विक्रेत्यांना हुसकावून लावण्यात आले. येथील जवळपास अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. तिसऱ्या पथकाने लकडगंज झोनअंतर्गत

मिनिमातानगर भागातील मार्गावर कारवाई करण्यात आली. मिनिमातानगरातील मनपा शाळा परिसरातील मंदिरच्या आसपासचे अतिक्रमण हटविले. तेथे बाजार भरत असल्याने अतिक्रमणधारकांना दिवसाची मुदत देण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या पथकाने हरीहर मंदिर परिसरात कारवाई करण्यात आली. कारवाईत परिसरातील घड्याळ विक्रेते, हेल्मेट विक्रेते, ज्यूस ठेले, नाश्‍ता-चहाविक्रेते आणि पानठेले हटविण्यात आले. अशाप्रकारे अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. कारवाई सहाय्यक आयुक्त ए. बी. पाटील, भागडे, माळवे, अली, शिंगणे यांच्यासह धंतोली, मंगळवारी व लकडगंज झोनच्या कर्मचाऱ्यांना सहभाग होता.

Web Title: Temporary encroachment

टॅग्स