अकोल्यात 10 नगरसेवकांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

अकोला - अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीआधीच कॉंग्रेसमध्ये पक्षांतराचा भूकंप झाला आहे. कॉंग्रेस, भारिप बहुजन महासंघ, समाजवादी पक्ष, युडीएफ आणि अपक्ष अशा दहा नगरसेवकांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आणण्याची जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांची खेळी यशस्वी होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या दहाही नगरसेवकांचा मुंबईत उद्या (मंगळवार, ता. 19) राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होत आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीत अकोला पश्‍चिम मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने विजय देशमुखांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर देशमुख यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा आली. गत काळात पक्षात आलेली मरगळ विजय देशमुखांच्या प्रवेशाने दूर झाली. शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची मजबूत बांधणी करण्यावर विजय देशमुखांनी भर दिला. महापालिकेत सत्ता कोणत्याही पक्षाची असो तेथील राजकारणावर विजय देशमुखांचा वरचष्मा राहत असल्याने समर्थकांची मोठी फळी त्यांच्यासाठी काम करते. आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी कॉंग्रेससह इतर पक्षातील समर्थक नगरसेवकांना राष्ट्रवादीत आणण्याची खेळी विजय देशमुखांनी केली आहे. यामध्ये कॉंग्रेसचे माजी उपमहापौर रफिक सिद्धीकी, दिलीप देशमुख, कोकिळा डाबेराव, निहकत शाहिन अफसर कुरेशी, रिजवाना शेख अजीज, जया गेडाम या सहा नगरसेवकांचा समावेश आहे. यासोबतच भारिप बमसंच्या माजी महापौर ज्योत्स्ना गवई, समाजवादी पक्षाचे नगरसेवक नकीर खान, युडीएफच्या रहिमाबी अब्दुल्ला खान, अपक्ष नगरसेविका हाजराबी अब्दुल रशीद हेसुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 
 
Web Title: ten corporators to switch to ncp