दहा दिवसांनंतर पारा प्रथमच नीचांकीवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

विदर्भातील तापमान अंश सेल्सिअसमध्ये
नागपूर 42.9
अमरावती 37.8
बुलडाणा 37.3
ब्रह्मपुरी 43.5
चंद्रपूर 43.6
गोंदिया 43.8
वर्धा 42.4
यवतमाळ 40.0

नागपूर - गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्‍याने होरपळून निघालेल्या विदर्भवासींना रविवारी किंचित दिलासा मिळाला. ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील सर्व शहरांमध्ये कमाल तापमानात घट झाली. नागपुरात तब्बल दहा दिवसांनंतर पारा प्रथमच त्रेचाळिशीच्या खाली आला. येत्या आठवड्यात पारा स्थिर राहण्याची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

विदर्भात उन्हाच्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. 18 एप्रिलला तापमानाने 45.5 अंशांची झेप घेतल्यानंतर पाच दिवसांत पाऱ्यात दिवसागणिक घट होत आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यामुळे आणखी दीड अंशांनी घसरून 42.9 अंशांवर स्थिरावला. गेल्या दहा दिवसांत कमाल तापमान प्रथमच 43 अंशांच्या खाली आले.

यापूर्वी 13 एप्रिलला तापमान 42.8 अंशांवर गेले होते. ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक प्रभाव अमरावती (37.8 अंश सेल्सिअस) आणि बुलडाणा (37.3 अंश सेल्सिअस) येथे जाणवला. दोन्ही शहरांत पारा चाळीस अंशांच्या खाली आला. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद गोंदिया (43.8 अंश सेल्सिअस) येथे करण्यात आली.

विदर्भातील तापमान अंश सेल्सिअसमध्ये
नागपूर 42.9
अमरावती 37.8
बुलडाणा 37.3
ब्रह्मपुरी 43.5
चंद्रपूर 43.6
गोंदिया 43.8
वर्धा 42.4
यवतमाळ 40.0

Web Title: Ten days later, Mercury was down for the first time in Nagpur