खासदार नवनीत राणांच्या घरी कोरोनाची एंट्री; तब्बल इतक्या जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह… 

covid 19
covid 19

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील एकूण दहा सदस्य पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे. 

आमदार रवी राणा यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या सुमारे 55 जणांच्या घशातील स्वॅब घेण्यात आले होते. त्यात आमदारांच्या वडिलांचा अहवाल रविवारी, २ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आईचासुद्धा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, कुटुंबातील व निकटवर्तीय अशा एकूण आठ सदस्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू होती. आई, वडील, बहीण, जावई, पुतण्या, दोन भाच्या, दोन मुले व एका अंगरक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

आमदार रवी राणा यांचे निवासस्थान असलेल्या शंकरनगर परिसराला कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम यांनी आमदारांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली. 

अवश्य वाचा- चौघांना घरी जाण्याची ओढ... एकमेकांचे हात घट्ट पकडले, पाण्याचा मधोमध हाताची साखळी तुटली अन् घडली दुर्दैवी घटना...

कोरोनाशी लढू या... 

माझ्या कुटुंबातील सात-आठ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वांनी या काळात काळजी घेणे आवश्‍यक आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून आपली काळजी घ्यावी. आपण कोरोनाशी लढू या, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com