शहरात दहा लाखांची वीज चोरी

ten lacks electricity thefts in the akola city
ten lacks electricity thefts in the akola city

अकोला : शहरातील अकोट फैल भागात महावितरणने केलेल्या कारवाईत 31 ठिकाणी वीज चोऱ्या उघड झाल्या असून यात दहा लाखांपेक्षा जास्त रूपयाची वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  महावितरणला लागलेल्या वीज चोरीच्या या गुन्ह्यांना नष्ट करण्यासाठी यानंतर वीज चोरी विरोधात सतत कारवाईचे निर्देश अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी दिले आहे.


अकोला शहर विभागाअंतर्गत अकोट फैल भागात नोव्हेंबर महिन्यात वीज चोरीविरोधात धाडसत्र राबवत ही कारवाई करण्यात आली. अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनात आणि कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी यांच्या नेतृत्वात महावितरण भरारी पथक व अकोला शहर उपविभाग तीन यांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत 1 लाख 50 हजार 902 युनिट म्हणजेच 10 लाख रूपयांपेक्षा जास्त रूपयाची वीज चोरी होत असल्याचे उघड करण्यात आले आहे. नियमानुसार तडजोड रकमेचा व वीजचोरी केलेल्या रकमेचा भरणा न करणाऱ्या या ग्राहकांवर विद्युत कायद्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
वीज चोरीची ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात अतीरिक्त कार्यकारी अभियंते अजितपाल सिंग दिनोरे, संदिप कायंदे, उपकार्यकारी अभियंते संतोष राठोड, अभिजीत पाटील, राजेश लोणकर, अमित मिरगे, सहाय्यक अभियंते लहाने, सानपसह तांत्रिक कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

वीज चोरीमुळे धोकादायक घटनांची शक्यता
वीज चोरीमुळे वीजेचा भार कमी जास्त होणे, वारंवार शार्टसर्किट होणे, आग लागणे, रोहीत्र जळणे असे प्रकार होत असल्याने अखंडित सेवा देण्यास महावितरणला अडथळा निर्माण होतो. शिवाय महावितरणची वितनणहानी वाढून आर्थीक नुकसानही होते. त्यामुळे यापुढे आकस्मिक आणि सतत कारवाई करण्याचे निर्देश मुख्य अभियंता अनिल डोये यांनी दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com