दहा गर्भवतींमध्ये दोघींना मधुमेह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

नागपूर - अलिकडे मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून दर दहा गर्भवतींमध्ये  २ महिला या गोड आजाराच्या विळख्यात सापडत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. डायबेटिज केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया, इंडियन मेडिकल असोसिएशन, स्त्री व प्रसूतीरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ जुलैरोजी रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईन्टमध्ये ‘हॅलो डायबेटिज ॲकेडमिया-२०१८’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर संयोजक डॉ. सुनिल गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला.   

शुक्रवार ६ जुलै रोजी दुपारी १ वाजता ‘मधुमेह व गर्भावस्था’या विषयावर होणाऱ्या चर्चासत्राचे उद्‌घाटन सामाजिक कार्यकर्ता कांचन नितीन गडकरी, डॉ. राणी बंग यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी डॉ. लॉरेन्स हर्श(युएसए), डॉ. लुईस गार्डेट (पोर्तुगाल),डॉ. सुंदर मुदलियार (युएसए) चर्चासत्रात सहभागी होतील.

शनिवार ७ जुलैरोजी ‘डायबेटिज एज्यूकेटर’साठी चर्चासत्र होईल. डॉ. शौकत सादीकोट,  डॉ. राजन वेलुकर, डॉ. शशांक जोशी, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. ए. के. दास, डॉ. विजय  पानीकर चर्चेत सहभागी होतील. रविवार ८ जुलैला मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. अंब्रिश मित्तल, डॉ. सुंदर मुदलियार, डॉ. लॉरेन्स हर्श यांच्या उपस्थितीत सत्र होतील. पत्रकार परिषदेला डॉ. कांचन सोरते, डॉ. सुषमा देशमुख, डॉ. सरिता उगेमुगे, कविता गुप्ता, डॉ. अजय अंबादे, उपस्थित होते.

गर्भवतीला मधुमेह झाल्यास इन्सुलिनची गरज वाढते. टाईप ‘टू’ मधुमेहाचा धोका निर्माण होतो. प्रसूत काळातील मधुमेह औषधाने प्रसूतीनंतर सामान्य होतो. परंतु गर्भावस्थेतील मधुमेहीं महिलांना त्यांच्या आयुष्यात दहा ते पंधरा वर्षानंतर मधुमेह होण्याची ५० टक्के शक्‍यता असते. गर्भवतीला मधुमेहावर उपचार न मिळाल्यास बाळामध्ये विकृतीची शक्‍यता असते. 
- डॉ. सुनिल गुप्ता, संयोजक, हॅलो डायबेटिज ॲकेडेमिया २०१८, नागपूर. 

Web Title: In ten pregnant women, two of them have diabetes