परीक्षा विभागात लागणार विविध शुल्कांचे दरपत्रक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभाग परिसरात मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय आहेत. अधिकचे पैसे आकारून विद्यापीठातून प्रमाणपत्र मिळवून देण्याचे काम सर्रास सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. या दलालांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला जाग आली असून परीक्षा विभागात विविध प्रमाणपत्रांच्या शुल्काचे दरपत्रक लावले जाणार आहे.

प्रवेश घेतेवेळी आवश्‍यक असलेल्या प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी परीक्षा भवनात येतात. ही सर्व प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क आकारण्यात येते. मात्र, त्यासाठी लागणारा अवधी निघून गेल्यावरही अनेकदा प्रमाणपत्र मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे लवकरात लवकर काम व्हावे यासाठी बाहेरच्या जिल्हा वा तालुक्‍यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दलाल आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून अधिकचे पैसे उकळत प्रमाणपत्र देत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे हे दलाल विविध महाविद्यालयांशी संबंधित असल्याचे समजते. विद्यार्थ्यांचा फायदा घेत परीक्षा भवन परिसरात सक्रिय असलेले दलाल गरजू विद्यार्थ्यांना गाठून त्यांच्याकडून दोनशे रुपयांत तयार होणाऱ्या प्रमाणपत्रासाठी दोन हजारांची मागणी करतात. ही बाब लक्षात येताच विद्यापीठ प्रशासनाने आता परीक्षा भवन परिसरात विविध प्रकारच्या शुल्काचे दरपत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रमाणपत्र किती दिवसात उपलब्ध होईल याचीही माहिती फलकात देण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tender in the examination section