खुनानंतर कन्हानमध्ये तणाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

टेकाडी (कन्हान) - अभिषेक बलेंद्र मालाधरे याच्या खुनानंतर रविवारी (ता. २९) नागरिकांनी आरोपींच्या घरावर धावा बोलून घर जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, आंदोलकांनी नगर परिषदेची तसेच एक खासगी गाडी फोडली. सोमवारी (ता. ३०) अभिषेकचा मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेवल्याने परिसरात दिवसभर तणाव होता.

रविवारी संध्याकाळी कन्हान येथील अभिषेक (वय १७, रा. धरमनगर) याला क्षुल्लक  कारणावरून अल्पवयीन आरोपीने कुकरीने वार करून गंभीर जखमी केले होते. त्याला  कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. डॉक्‍टरांनी नागपूर येथे उपचारासाठी पाठविले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हे वृत्त कन्हानमध्ये पोहोचताच तणाव वाढला. 

रात्रीच आरोपींच्या घरावर काही लोक चालून गेले होते. चिथावणी दिल्याने महेंद्र मालाधरे, रवींद्र डोंगरे, राजेश आकोणे यांना पोलिसांनी अटक केली होती. तर जमावाला शांत करण्यासाठी अल्पवयीन आरोपी व त्याचे वडील मुकेश महतो यांना मध्यरात्री उशिरा अटक करण्यात आली. 

सोमवारी दिवसभर चौकाचौकांत पोलिसांचा बंदोबस्त होता. तसेच दंगा नियंत्रक पथक तैनात करण्यात आल्याने कर्फ्युसदृश परिस्थिती होती. अभिषेक याचा मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेवून आरोपींना कठोर शिक्षा तर चिथावणी देणाऱ्या अटकेतील अन्य तिघांना नागरिकांनी सोडण्याची मागणी केली. तणाव अधिक वाढू नये याकरिता पोलिसांनी चिथवाणी देणाऱ्यांना सोडले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: tension after murder