भांडे प्लॉट ः दुकानाच्या अतिक्रमणावरून निर्माण झालेल्या तणावावर नियंत्रणासाठी तैनात पोलिस व स्थानिक नागरिकांची गर्दी.
भांडे प्लॉट ः दुकानाच्या अतिक्रमणावरून निर्माण झालेल्या तणावावर नियंत्रणासाठी तैनात पोलिस व स्थानिक नागरिकांची गर्दी.

अतिक्रमणावरून दोन गटांत तणाव

नागपूर : बिल्डरने अनधिकृत बांधकाम करीत पार्किंगमध्येच दुकाने काढली. यातील एका गुंड प्रवृत्तीच्या दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराच्या दुकानावर ताबा घेतल्याने झालेल्या वादामुळे भांडे प्लॉट चौकात तणाव निर्माण झाला. स्थानिक नागरिकांच्या जमावाने या गुंड दुकानदाराचा कायमचा बंदोबस्त करण्याठी पाऊल उचलल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले. अखेर महापालिकेने या अनधिकृत दुकानांसोबतच सतत दोन गटांतील वादावरही बुलडोझर फिरवले. भांडे प्लॉट चौकात वंजारी हॉस्पिटलची इमारत असून पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या दुकाने बांधण्यात आली होती. बिल्डरने दुकाने विक्री करताना दोन दुकानदारांत भांडणे लावली. यातील एका दुकानात जयंतीलाल जैन यांचे किराणा दुकान आहे. त्यांना दुकान क्रमांक 104 देण्यात आले. मात्र रजिस्ट्री दुकान क्रमांक 101 ची करून देण्यात आली होती. दुकान क्रमांक 101 गुंड प्रवृत्तीच्या बंटी उर्फ शेर खान याला विकण्यात आले होते. तशी रजिस्ट्रीही बिल्डरने करून दिली. जयंतीलाल जैन यांनी 101 ची रजिस्ट्री बंटीच्या नावे करून दिली. बंटी जयंतीलाल जैन यांच्या दुकानावरही ताबा करण्याचा प्रयत्न करीत होता. आज सकाळी सहाच्या सुमारास जयंतीलाल जैन दुकान उघडण्यास आले असता त्यांना शटरचे कुलूप तोडून नवे लावलेले दिसून आले. याबाबत बंटी शेखला विचारणा केली असता, त्याने मारहाण केल्याचा आरोप जैन यांनी केला असून त्यांनी सक्करदरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या घटनेने स्थानिक नागरिकांनही गुंड बंटीवर चालू आले. नागरिकांच्या तावडीतून तो निसटला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच सक्करदऱ्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत यादव आपल्या ताफ्यासह तेथे पोहचले. महापालिकेचे क्रीडा व सांस्कृतिक सभापती नागेश सहारे, नगरसेविका स्नेहल बिहरे, रिता मुळे, अतिक्रमण विभागाचे अधिकारी आपल्या पथकासह तेथे पोहचले. सहायक आयुक्त हरीश राऊत यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर अतिक्रमण पाडण्यास सुरुवात करण्यात आली. या कारवाईदरम्यान भांडे प्लॉट चौकाला छावणीचे स्वरूप आले. महापालिकेने अनधिकृत बांधकामासाठी यापूर्वीच या दुकानदारांना नोटीस बजावली होती. नोटीसची मुदत संपल्याने महापालिकेचे पथक दोन जेसीबीसह येथे पोहोचले. महापालिकेने सकाळी साडेनऊ वाजतापासून सुरू केलेली कारवाई सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली.
गुंडाच्या वडिलांना चोप
बंटीचा उपद्रव वाढल्याने दोन, तीन महिन्यांपासून नागरिकांच्या मनात असंतोष खदखदत होता. गुंड बंटी पळून गेल्याने नागरिक चिडले. प्रचंड तणावाचे वातावरण असताना बंटीचे वडील जमावात आले आणि त्यांनी आपल्या मुलाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी त्याची बाजू घेतली. त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या जमावातील काहींनी बंटीच्या वडिलांना चोप देऊन पळवून लावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com