भयंकर! पाळण्याचा गळफास लागल्याने मुलाचा मृत्यू

भयंकर! पाळण्याचा गळफास लागल्याने मुलाचा मृत्यू

नागपूर : घरात बांधलेल्या पाळण्यावर खेळत असताना अचानक गळ्याला फास लागून मोहित नरेंद्र ढोरे (9, रा. पारडी बाराद्वारी, कापसी खुर्द) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना पारडी परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापसी खुर्दजवळ ढोरे कुटुंब राहते. नरेंद्र ढोरे हे शेतमजूर असून, त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा लहान मुलगा आजारी असल्यामुळे मोठा मुलगा मोहित हा घरी होता. शनिवारी सकाळी दहाला दोघेही पती-पत्नी शेतीच्या कामाला निघून गेले, तर मुले घरी होते. दुपारी दोघांनीही जेवण केल्यानंतर आजारी भावाला मोहितने झोपवले. त्यानंतर तो घरात बल्लीला बांधलेल्या पाळण्यावर खेळत होता. पाळण्यावर गोल-गोल गुंडाळून खेळत असताना मोहितला अचानक फास लागला. गळ्याला घट्ट फास बसल्यामुळे मोहितचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी सहाला आई घरी आली असता मोहित अडकलेल्या अवस्थेत दिसला. आईने मोठ्याने हंबरडा फोडल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. मोहितला मेयोत दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. पारडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com