भयंकर! दिवाळीत मिरवण्यासाठी लांबविला मोबाईल 

file photo
file photo

नागपूर : थकलेले घरभाडे चुकविण्यासह दिवाळीची खरेदी करून मिरविता यावे यासाठी युवक नीलेश कडवे (22) याने चोरीचा मार्ग स्वीकारला. रेल्वेस्थानकावरून प्रवाशाचा मोबाईल लांबविला. ग्राहक शोधण्यापूर्वीच लोहमार्ग पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि दिवाळीच्या तोंडावर गजाआड व्हावे लागले. 
लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीलेशचे आईवडील वेगवेगळे राहतात. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तो फायनान्स कंपनीत काम करून लागला. रेशीमबागेत भाड्याच्या खोलीत तो वास्तव्यास आहे. मिळणारे वेतन फारच तुटपुंजे असल्याने भाडे थकले. दिवाळी तोंडावर येऊनही खिशात दमडी नाही. अशा स्थितीत चोरीची कल्पना सुचली व अजनी रेल्वेस्थानक गाठले. पीयूष थोरात (21, रा. अमरावती) हा परतीच्या प्रवासासाठी रेल्वेस्थानकावर आला होता. चोरट्याने त्याच्यासोबत बोलणे सुरू करीत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच पीयूष डुलक्‍या घेऊ लागला. चोरट्याने संधी साधून त्याचा महागडा मोबाईल लांबविला. जाग येताच मोबाईल चोरीला गेल्याचे पीयूषच्या लक्षात आले. त्याने लोहमार्ग ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नीलेश त्याच्या जवळ दिसत होता. पीयूषनेही त्याला ओळखले आणि त्याच्यासोबतच झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यातूनच तो रेशीमबागेत राहत असल्याचे पोलिसांना समजले. शिताफीने एकएक धागा जोडत पोलिसांनी चोरट्याला गाठले. त्याच्याकडून चोरीचा मोबाईलही जप्त करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com