भयंकर! बदला घेण्यासाठी केला खून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

कामठी (जि. नागपूर) : जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी 17 वर्षीय अल्पवयीन आरोपींनी खून केल्याची घटना कामठी पोलिस ठाणे हद्दीतील घोरपड शिवरात घडली. खुशाल ऊर्फ कौस्तुभ दामोधर सवई, (वय 17, रा. पारडी) असे मृताचे नाव असून त्याचा मृतदेह बुधवारी पोलिसांना आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 

कामठी (जि. नागपूर) : जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी 17 वर्षीय अल्पवयीन आरोपींनी खून केल्याची घटना कामठी पोलिस ठाणे हद्दीतील घोरपड शिवरात घडली. खुशाल ऊर्फ कौस्तुभ दामोधर सवई, (वय 17, रा. पारडी) असे मृताचे नाव असून त्याचा मृतदेह बुधवारी पोलिसांना आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, घोरपड शिवारात बुधवारी एका तरुणाचा मृतदहे नवीन कामठी पोलिसांना आढळून आला होता. मृताच्या अंगावरील कपडे व पायातील सॅंडलवरून त्यांच्या वडिलांनी ओळख पटविली. यानंतर त्याचा मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्या मित्रांना विचारणा केली, यातील एका 17 वर्षीय विधीसंघर्ष बालकाने सांगितलेल्या घटनाक्रमामध्ये विसंगती दिसून आल्याने त्यास ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केल्यावर मृत खुशाल 29 सप्टेंबर रोजी त्याच्यासोबत होता व त्यास भवानी मंदिर गेटजवळ सोडण्याचे सांगितले. सखोल विचारपूस केल्यावर, गणपती विसर्जनाच्या वेळी खुशाल याचे सोबत भांडण झाले होते. तेव्हा त्याने मला मारले. त्याचा बदला घेण्याकरिता खुशाल यास आरोपी विधीसंघर्ष बालक व त्याचा मित्र नामे राहुल रमेश येरपुडे, (वय 18, रा. पारडी) दोघांनी राहुलच्या दुचाकीवर बसवून फिरून येण्याचे सांगून घेऊन गेले. घोरपड येथील निर्जनस्थळी आणून जुन्या भांडणाचा सूड घेण्याकरिता त्याच्या डोक्‍यावर दगडाने वार केला. खुशाल पळू नये याकरिता राहुलने त्यास पकडून ठवले होते. आरोपी विधीसंघर्ष बालकाने खुशालच्या डोक्‍यावर त्याचा मृत्यू होईपर्यंत मारले व दोघांनी मिळून जवळ असलेल्या शेतामध्ये फेकून दिले. 
त्यानंतर आरोपीने त्याचा दुसरा मित्र 16 वर्षीय विधीसंघर्ष बालकास फोन करून चांगले कपडे तयार ठेवण्यास सांगितले. यानंतर आरोपी व राहुल व त्याच्या अन्य मित्रासह तुमसरकडे रवाना झाले. दरम्यान, खुशालचा मोबाईल आरोपीने काढून घेतला व 16 वर्ष वयोगटातील विधीसंघर्ष बालक मित्रास दिल्याची माहिती दिली आहे, पोलिस राहुल व दुसऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrible! Murder for revenge