भयंकर! विद्यार्थ्यांना सफाई कर्मचाऱ्यांची धक्काबुक्की

file photo
file photo

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज परिसरात असलेल्या वसतिगृहात सफाई कर्मचाऱ्यांच्या अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी (ता. 21) घडली. या प्रकाराची माहिती वसतिगृह अधीक्षकांना दिल्यावरही कारवाईऐवजी विद्यार्थ्यांना माझ्याकडे तक्रार करा, असा सल्ला दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे.
विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौकातील वसतिगृहासह इतर तीन वसतिगृहांच्या स्वच्छतेसाठी खासगी एजन्सीला जबाबदारी दिली आहे. मात्र, एजन्सीकडून वसतिगृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे कळते. या वसतिगृहातील खोल्या आठ दिवसांपासून स्वच्छ करण्यात आल्या नसल्याचे समजते.
शनिवारी परिसरातील विद्यार्थी परिसरातील कोपऱ्यात लघुशंका करताना सफाई कर्मचाऱ्याला आढळला. काही वेळातच त्याने याची माहिती सफाई कर्मचाऱ्यांच्या अधीक्षकांना दिली. त्याने थेट या विद्यार्थ्याच्या खोलीत शिरून कॉलर पकडून बाहेर आणले. याशिवाय इतर काही विद्यार्थ्यांनाही धक्काबुक्की केली. याची माहिती विद्यार्थ्यांनी वसतिगृह अधीक्षक डॉ. श्‍याम कोरेटी यांना दिली. मात्र, त्यांनी अधीक्षकांना तंबी देण्याऐवजी यापुढे याबद्दलची तक्रार माझ्याकडे करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. विशेष म्हणजे यापूर्वी विद्यार्थ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांची तक्रार केल्यानेच हा कंपनीच्या अधीक्षकाने धक्काबुक्की केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यासंदर्भात डॉ. कोरेटी यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com