खंडारझरी, झमकोलीत वाघाची दहशत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नांद : भिवापूर तालुक्‍यातील खंडारझरी व झमकोली शिवारात वाघाने गायीची शिकार केल्याने दहशत निर्माण झाली आहे. या घटनेत गुराखी बापलेक थोडक्‍यात बचावले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी दोन शेळ्याची शिकार केल्याचेही समोर आले आहे.

बोटेझरी येथे राहणारे नारायण नामदेव निहिटे व त्याचा मुलगा आकाश हे गावातील गुरे चारण्यासाठी शनिवारी (ता. 10) खंडारझरीच्या जंगलात गेले होते. सायंकाळच्या सुमारास घराकडे परत येत असताना वाघाने कळपातील एका गायीवर झडप घातली. त्यावेळी दोघेही बापलेक काहीवेळ घाबरले पण हिंमत सोडली नाही. आरडाओरड करत काठ्या उगारत व दगड भिरकावत प्रतिकार करून गायीला त्याच्या तावडीतून सोडविले. हल्ला केलेल्या गायीलाही सोबतच आणले पण त्या गायीला चालणे शक्‍य न झाल्यामुळे बोटेझरीच्या तलावाजवळ तिचा मृत्यू झाला. घाबरलेल्या गुराख्यांनी जंगलात जनावरे चारण्यास नकार दिला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी घटना उघडकीस आल्यावर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terror of tiger