Vidhan Sabha 2019 : प्रत्येक तालुक्‍यात टेक्‍स्टाइल क्‍लस्टर देऊ : नितीन गडकरी

हिंगणघाट : विचार व्यक्त करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
हिंगणघाट : विचार व्यक्त करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

हिंगणघाट (वर्धा) :  ग्रामीण शेती आणि अतिदुर्गम भाग हा मागील 70 वर्षांत दुर्लक्षित राहिला. मागील पाच वर्षांपासून आम्ही धोरणात्मक निर्णय घेणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात 13 सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर दिलेत. येणाऱ्या काळात प्रत्येक कापूस उत्पादक तालुक्‍यात सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर देऊ, असे आश्‍वासन शनिवारी (ता. 12) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोकुलधाम मैदानावर भाजप-शिवसेना व घटकपक्ष युतीचे उमेदवार आमदार समीर कुणावार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केली.
सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, यशवंतराव चव्हाण शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, जिल्हा संघटक रविकांत बालपांडे, रमेश धारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, आपल्या देशातील शेतकरी पेट्रोल-डिझेलला पर्याय देऊ शकतात. एनर्जी क्रॉफ्टला प्रोत्साहन दिले पाहिजे. शेतीपूरक उद्योगधंदे वाढले पाहिजे. विदर्भात 25 लाख लिटर दुधाची विक्री होऊ शकेल, अशी व्यवस्था आपण तयार करीत आहोत.
नागपूर-हैदराबाद द्रुतगती मार्ग हिंगणघाट येथून जाणार आहे. त्यामुळे या भागाचा चहुमुखी विकास होईल. नागपूर-चंद्रपूर, नागपूर-वर्धा व विदर्भातील काही महत्त्वाच्या शहरांना ब्रॉडगेज मेट्रोशी जोडणार आहोत. त्यामुळे 10 हजार युवक-युवतींना रोजगार मिळेल. जे सिंचन प्रकल्प कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात अर्धवट पडून होती, ती स्मारके आम्ही कामांमध्ये बदलून पूर्ण करीत आहोत. विदर्भ खनिज संपत्ती व जंगलाबाबत संपन्न व समृद्ध आहे. तरीही विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. हा इतिहास दुखावणारा आहे. हा प्रश्‍न सुटला पाहिजे, असेही श्री. गडकरी म्हणाले. भय-भूक-आतंकमुक्त देश घडवून सामाजिक व आर्थिक समता आणायची आहे. त्यासाठी आमचे राजकारण आहे. येथील युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन श्री. गडकरी यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी विचार व्यक्त केले. संचालन किशोर दिघे यांनी केले. राकेश शर्मा यांनी आभार मानले.
अमानवीय शोषणाची प्रथा बंद
रिक्षाच्या माध्यमातून माणूस माणसाला ओढतो. या एक कोटी लोकांच्या दुर्भाग्यशाली व अमानवीय शोषणाची प्रथा मी बंद केली. तसा लोकसभेत ठराव मांडला. एक कोटी रिक्षाचालक आज ई-रिक्षा चालवायला लागले आहेत. या कामाबद्दल ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव यांनी मला शाबासकी दिली, ही माझ्या संपूर्ण राजकारणातील मोठी उपलब्धी आहे, असे मनोगत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com