ठवकर हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नागपूर - ठवकर ज्वेलर्स हत्याकांडातील आणखी एक आरोपी दारासिंह ऊर्फ सतनसिंह बावरी (मेहकर) याला आज जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली. या घटनेत यापूर्वी तीन आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. 

नागपूर - ठवकर ज्वेलर्स हत्याकांडातील आणखी एक आरोपी दारासिंह ऊर्फ सतनसिंह बावरी (मेहकर) याला आज जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली. या घटनेत यापूर्वी तीन आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. 

मानेवाडा रोडवर ऑक्‍टोबर २०१२ मध्ये ही घटना घडली होती. ठवकर ज्वेलर्स येथे घुसून आरोपींनी दुकानातील पैसे आणि सोने लुटले. त्यांनी ठवकर यांच्यावर गोळ्या झाडल्या, तर या दुकानातील प्रसाद खेडकर यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. यात खेडकर जखमी झाले, तर ठवकर यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दारासिंग बावरी, त्याचा भाऊ लखनसिंग (बुटीबोरी), दारासिंग टाक (अमरावती), बन्ना सिंग आणि पंकेजसिंग कालूसिंग उधानी यांना अटक करण्यात आली होती. दारासिंग फरार होता. हुडकेश्‍वर पोलिसांनी पाचही आरोपींवर आरोपपत्र दाखल केले. 

२०१४ साली दारासिंग टाक (अमरावती) आणि बन्ना सिंग यांना जन्मठेपेची तर पंकजसिंग याला दरोडाप्रकरणी चार वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. बुटीबोरी येथील रहिवासी असलेले दारासिंग बावरी, त्याचा भाऊ लखनसिंग बावरी या दोघांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली होती. पुढे दारासिंग ऊर्फ सतवनसिंग वकीलसिंग बावरी यालासुद्धा अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध स्वतंत्र आरोपपत्र करून खटला भरण्यात आला. त्याला न्यायालयाने आजन्म कारावास आणि एकूण चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: thavkar murder case accused Life imprisonment punishment crime