Vidarbha Crime News: दिवाणी न्यायालयाच्या गेटवर आढळला तरुणीचा मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

न्यायालयाच्या निर्माणाधीन इमारतीच्या गेटवरतीच हा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ
Vidarbha Crime News, Chandrapur News
Vidarbha Crime News, Chandrapur News sakal

चंद्रपूर येथील ब्रम्हपुरीमधील दिवाणी न्यायालयाच्या इमारतीच्या गेटवर तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. न्यायालयाच्या निर्माणाधीन इमारतीच्या गेटवरतीच हा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. (Vidarbha Crime News)

ही तरुणी 27 वर्षाची असल्याची माहिती समोर आली आहे. तर या तरुणीचे नाव पौर्णिमा मिलिंद लांडे असल्याची माहिती समोर आली आहे. ही तरुणी गडचिरोली जिल्ह्यातील गावची रहिवासी आहे. ही मुलगी ब्रम्हपुरीमध्ये कशी आली. दिवाणी न्यायालयाच्या इमारतीच्या गेटवर आत्महत्या कशी केली. या सर्व घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या पोलिस याबाबत काहीच माहिती देऊ शकले नाहीत. या घटनेचा सध्या तपास सुरू आहे.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

मात्र ब्रम्हपुरीमधील दिवाणी न्यायालयाच्या अगदी प्रवेश द्वारावर मृतदेह आढल्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सामान्य नागरिक आणि पोलिस यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी घटनास्थळी झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Vidarbha Crime News, Chandrapur News
Eknath Shinde:'निमंत्रण सर्व पक्षाला गेलं होतं, पण...जी 20च्या बैठकीला रिकामी खुर्ची दिसताच शिंदे म्हणाले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com