मोठी बातमी : दोन दिवसांत दोघांना ठार करणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

मोठी बातमी : दोन दिवसांत दोघांना ठार करणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात बुधवारी (ता. १६) एका कामगाराचा बळी घेणाऱ्या पट्टेदार नर वाघाला सोमवारी (ता. २१) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देऊन जेरबंद (Tiger captured) करण्यात आले. आतापर्यंत दोन लोकांना या वाघाने ठार केले होते. त्यांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडले होते, हे विशेष...

चंद्रपूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात बुधवारी (ता. १६) रात्री पावणे अकराच्या सुमारास भोजराज मेश्राम (वय ५०) या कामगाराला वाघाने उचलून नेले होते. दुसऱ्या दिवशी त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. वाघाने भोजराज यांचे डोके धडावेगळे केले होते. त्यांच्या शरीराची अक्षरक्षः चाळणी झाली होती.

मोठी बातमी : दोन दिवसांत दोघांना ठार करणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद
मायावती, बसपाबाबत भाजपची मवाळ भूमिका; अमित शहा म्हणाले...

चंद्रपूर (Chandrapur) महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात कामावरून सायकलने घरी निघालेल्या कामगाराला वाघाने उचलून नेत ठार केल्याच्या घटना घटनेला २४ तास होत नाहीत तोच गुरुवारी रात्री सोळा वर्षीय युवक राज भडके याला उचलून नेले होते. त्याने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक गोळा झाले होते. त्यानंतर वनविभाग आणि वीज केंद्राच्या सुरक्षा यंत्रणेला या घटनेची माहिती देण्यात आली. यंत्रणेने शोधमोहीम राबविली. मात्र, राजचा काहीच पत्ता लागला नाही.

वन्यजीव विभागाचे मुख्य वन संरक्षकांनी वीज केंद्राच्या परिसरात वावरणाऱ्या चार वाघांना पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वन पथक या वाघांचा शोध घेत होते. सोमवारी रात्री उशिरा ९.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर वीज केंद्र ऊर्जानगर वसाहतीतील न्यू एफ गाळा परिसरात वीज केंद्राचे विशेष पथक आणि वनविभाग यांची संयुक्त शोधमोहीम सुरू असताना पथकातील कर्मचाऱ्यांना वाघ दिसला.

मोठी बातमी : दोन दिवसांत दोघांना ठार करणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद
मंत्री म्हणाले, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येमागे मुस्लिम

वाघ दिसताच शूटर अजय मराठे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी वाघाला डॉट मारला. यात वाघ बेशुद्ध (Tiger captured) झाला. त्यानंतर त्याला पकडण्यात यश आले. वाघ पकडल्याची माहिती मुख्य वन संरक्षण एन. आर. प्रवीण व वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी दिली. वाघाला पकडणाऱ्या टीममध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, अजय मराठे, राकेश आहुजा, पवन कुळमेथे, अतुल मोहुर्ले, भोजराज दांडेकर, अमोल कोरपे, अमोल तिखट, नन्नवरे यांचा समावेश होता.

मोठी बातमी : दोन दिवसांत दोघांना ठार करणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद
मायावती, बसपाबाबत भाजपची मवाळ भूमिका; अमित शहा म्हणाले...

जीव टांगणीला लागला होता

वीज केंद्राच्या परिसरात आणि कामगार वसाहतीत बिबटे आणि वाघांचा वावर असल्याचे अनेकदा समोर आले. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी या भागात वाघ फिरत आहे, अशी माहिती वीज केंद्राच्या व्यवस्थापनाने वनविभागाला दिली होता. दुसऱ्याच दिवशी भोजराज मेश्राम यांना वाघाने लक्ष्य केले. वीज केंद्राच्या गेट क्रमांक १३ जवळ ही घटना घडली होती. या घटनेमुळे वीज केंद्राच्या वसाहतीतील रहिवासी आणि कामगारांचा जीव टांगणीला लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com