esakal | "तुमच्या घरी गुप्तधन आहे पण त्यासाठी पूजा करावी लागेल" असं म्हणत केलं धक्कादायक कृत्य 

बोलून बातमी शोधा

abc}

येथील इंदिरानगरातील सागर अजय पडियाल हा आयुर्वेदिक डॉक्‍टर, अजय जोधा पडियाल हा पूजापाठ करणारे महाराज असे सांगून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरी आयुर्वेदिक औषधी देण्यासाठी घरात प्रवेश मिळवित होते.

"तुमच्या घरी गुप्तधन आहे पण त्यासाठी पूजा करावी लागेल" असं म्हणत केलं धक्कादायक कृत्य 
sakal_logo
By
टीम ई सकाळ

चंद्रपूर : घरी गुप्तधन असल्याचे सांगून ते काढण्यासाठी सुमारे अडीच लाखाची मागणी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी (ता. 7) इंदिरानगर परिसरातील रेल्वे पटरीजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या दोघांनी आयुर्वेदिक डॉक्‍टर आणि पूजापाठ करणारे महाराज असल्याचे सांगितले. सागर अजय पडियाल (वय 27), अजय जोधा पडियाल (वय 45) अशी अटकेतील व्यक्तींची नावे आहेत.

येथील इंदिरानगरातील सागर अजय पडियाल हा आयुर्वेदिक डॉक्‍टर, अजय जोधा पडियाल हा पूजापाठ करणारे महाराज असे सांगून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरी आयुर्वेदिक औषधी देण्यासाठी घरात प्रवेश मिळवित होते. त्यानंतर घरात सोने-चांदीचे धन आहे. त्यासाठी महाराजाकडून पूजापाठ करावी लागते. त्यासाठी सुमारे अडीच लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगत होते. 

हेही वाचा - नागरिकांनो सावधान! हवामान खात्यानं दिला धोक्याचा इशारा; प्रचंड तापमानवाढीचे संकेत

असाच प्रकार 6 मार्चला गोंडसावरी येथे घडला. रवींद्र यादव पेंदोर (वय 38) याच्या घरी हे दोघे गेले. घरी गुप्तधन असल्याचे सांगितले. त्यानंतर अडीच लाखाच्या खर्चातील सुमारे 45 हजार रुपयांची मागणी केली. ती मागणी पेंदोर यांनी पूर्णही केली. यानंतर उर्वरित दोन लाखाच्या रकमेची मागणी सुरू केली. त्यानुसार इंदिरानगरातील रेल्वे पटरी चौकात उर्वरित रक्कम देण्यासाठी पेंदोर तेथे आले होते.

या प्रकाराची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचून सागर पडियाल, अजय पडियाल या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीअंती या दोघाने पेंदोर यांची फसवणूक केल्याची कबुली दिली. 

हेही वाचा - Maharashtra Budget 2021 : नागपुरात प्रशासकीय इमारतीला २५० कोटी, गोसेखुर्दला १ हजार कोटी; वाचा...

मूल पोलिस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, सुरेश केमेकर, गणेश भोयर, प्रदीप मडावी, गणेश मोहुर्ले, संजय वाढई, गोपीनाथ नरोटे, मयूर येरणे यांच्या पथकाने केली. 

संपादन - अथर्व महांकाळ