दोन शिक्षकांच्या घरी दिवसाढवळ्या घरफोडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

हिंगणघाट (जि. वर्धा) : शहरातील संत तुकडोजी वॉर्डात दोन जि. प. शिक्षकांच्या घरी घरफोड्या होऊन 20 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. मात्र, सोमवारी झालेल्या चोरीची बातमी वाचून एका शिक्षकाने दागिन्यांचा डबा दुसरीकडे लपवून ठेवल्याने 2 लाखांचा ऐवज बचावला. आज, मंगळवारी भरदिवसा ही घटना घडली.
राष्ट्रसंत तुकडोजी वॉर्ड येथील रहिवासी शिक्षक रमेश भिलकर व विक्रम तामगाडगे यांच्या घरी आज दिवसाढवळ्या घराच्या दर्शनीय दाराचा कोंडा तोडून चोऱ्या झाल्या. मागील 48 तासांच्या आत हिंगणघाट शहरात एकूण पाच चोऱ्या झाल्या. परिणामी, हिंगणघाट शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

रमेश भिलकर हळदगाव येथे शिक्षक आहेत. त्यांच्या पत्नी सरला भिलकर येथील होलिक्रॉस शाळेत शिक्षिका आहेत. आज सकाळी सातला सरला भिलकर शाळेत गेल्या होत्या. तर रमेश भिलकर घराला कुलूप लावून हळदगाव येथील शाळेत गेले होते. चोरट्यांनी संधी साधून 15 हजारांचा ऐवज लंपास केला.
शिक्षक विक्रम तामगाडगे यांच्या घरीदेखील त्याच पद्धतीने दाराचा कोंडा तोडून चोरी केल्याची घटना घडली. विक्रम तामगाडगे वाशी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असल्याने ते सकाळी घराला कुलूप लावून शाळेत गेले होते. याचदरम्यान त्यांच्या घरी चोरी केल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी त्यांच्याकडील नगदी तीन हजार रोख व दोन हजार रुपयांचे चांदीचे दागिने, असा पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft in the home of two teachers