अमरावतीत अबकी बार सव्वातीनशे पार; दुचाकी चोरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

शहरात दहा ठाण्यांच्या हद्दीत दर दिवसाला एक किंवा दोन दुचाकी चोरीच्या घटना घडल्या. अकरा महिने पंधरा दिवसांत शहरात अबकी बार सव्वातीनशेच्या पार असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण गतवर्षात वर्षभरात 275 दुचाकी चोरीस गेल्या होत्या. 

अमरावती : शहराप्रमाणे, ग्रामीण भागात दुचाकीचोर सक्रिय असताना, टोळीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येत नाही. आयुक्तालयात गाडगेनगर, राजापेठ, शहर कोतवाली, बडनेरा, ठाण्याच्या परिसरातच सर्वाधिक दुचाकी चोरीस गेल्या. दाखल होणाऱ्या गुन्ह्यांपैकी पंचवीस टक्के गुन्हे हे फायनान्स कंपनी व दुचाकीस्वार यांच्या साठगाठीतून दाखल होतात. त्यावर यंत्रणेला अंकुश लावता आलेला नाही. 

गुरुवारी (ता. 13) पुन्हा दुचाकी चोरीचा गुन्हा बडनेरा ठाण्यात दाखल झाला. इशांत तोलाराम मेघवानी (वय 30 रा. सिंधीकॅम्प, बडनेरा) यांनी त्यांची एमएच 27 एझेड 9107 क्रमांकाची दुचाकी नवीवस्ती येथील गोदामासमोर उभी केली होती. ती कुणीतरी चोरली. मेघवानी यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

Image may contain: one or more people and motorcycle

वरुड पंचायत समितीसमोरून दुचाकी गायब 

गुरुवारी (ता. 14) ग्रामीण भागात दुचाकी चोरीचे सहा गुन्हे दाखल झाले. नांदगावखंडेश्वर तालुक्‍यात नागपूर ते औरंगाबाद मार्गावर नंददीप वासुदेव हुमने याने एमएच 27 ए एस 8533 क्रमांकाची दुचाकी उभी ठेवली असता चोरीस गेली. प्रकरणी मंगरुळ चव्हाळा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

वरुडच्या पंचायत समितीसमोर विलास नामदेव मदनकर यांनी एमएच 27 एएच 8472 क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. तीसुद्धा चोरी करून नेत असताना, संशयित आरोपी उमेश मुन्नालाल धुर्वे यास लोकांनी पकडले. वरुड पोलिसांनी धुर्वेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. 

No photo description available.

घरासमोरून, मंगलकार्यालयासमोरून केली चोरी 

धारणी तालुक्‍याच्या सुसर्दा गावात गजानन माधवराव मानकर यांनी घरासमोर उभी ठेवलेली एक दुचाकी चोरीस गेली. चोरीस गेलेली दुचाकी शासकीय होती. चांदूरबाजार येथील रघुवंशी मंगल कार्यालयासमोर पार्किंग केलेली जयंत माणिकराव निंभोरकर यांची एमएच 27 एव्ही 8675 क्रमांकाची दुचाकी चोरीस गेली.

हेही वाचा की : 'तो' बिबट्या ठरला अंधश्रद्धेचा बळी
 

दर्यापूर येथील जयस्तंभचौक बनोसामधून गौरव बाळासाहेब गावंडे यांची एमएच 27 बीजी 4010 क्रमांकाची दुचाकी चोरीस गेली. तर, दर्यापूरच्या शुभम मंगल कार्यालयासमोर ठेवलेली रमन अर्जून धोत्रे यांची एमएच 27 एबी 7803 क्रमांकाची दुचाकीही चोरीस गेली. धोत्रे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल झाले. 

हे वाचलंत काय? : देहविक्री व्यवसाय, प्रेयसी, तो अन्‌ खून
 

ग्रामीण भागात मंगल कार्यालये टार्गेट 

ग्रामीण भागात आता दुचाकी चोरट्यांनी चोरीसाठी मंगल कार्यालयाचा परिसरसुद्धा टार्गेट केला आहे. कारण चांदूरबाजार व दर्यापूर ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेल्या दोन दुचाकी या मंगल कार्यालयासमोरूनच चोरीस गेल्याचे दिसून येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of two thousand seven hundred bikes in Amravati district