Vidhan Sabha 2019 : जिल्ह्यात 12 जागांसाठी 146 उमेदवार रिंगणात 

file photo
file photo

नागपूर : विधानसभेच्या मतदानास एकच दिवस शिल्लक आहे. सर्वच मतदारसंघांसाठी मतदानयंत्रे तयार केली आहेत. जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण 146 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. सोमवारी (ता. 21) चार हजार 412 मतदान केंद्रांवर 41 लाख 71 हजार 420 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 
एकाच मतदान केंद्रावर 1,500 पेक्षा अधिक मतदार झाल्याने 30 सहायक मतदान केंद्रे नव्याने केली आहेत. इमारती जीर्ण झाल्याने तसेच आवश्‍यक सुविधा नसल्याने 85 मतदान केंद्रे बदलली आहेत. शिवाय 4,412 मतदान केंद्रांपैकी 440 मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. यामध्ये 55 संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश असणार आहे. शिवाय संवेदनशील मतदान केंद्रांच्या 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात थेट प्रक्षेपण (वेब कास्टिंग) करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक याप्रमाणे 12 मतदान केंद्रे सखी मतदान केंद्र असणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com