जिल्ह्यात 146 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

नागपूर: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांतून एकूण 32 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

नागपूर: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांतून एकूण 32 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

21 सप्टेंबर रोजी जिल्ह्यासह राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली. 27 सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण 205 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. 5 ऑक्‍टोबर रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेमध्ये यापैकी 27 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे 178 उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात होते. 7 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी मागे घ्यायची होती. आज जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघातून एकूण 32 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. या उमेदवारी मागे घेणाऱ्यांमध्ये भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष आदींचा समावेश आहे. राजकीय पक्षांसह अपक्षांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे बहुतांश ठिकाणी आता बंडाळी टळणार असल्याचे चित्र आहे. मात्र, काही ठिकाणी बंडखोर कायम आहे. याचा फटका पक्षाच्या उमेदवारांना किती बसतो हे मतमोजणीच्या नंतर स्पष्ट होईल. 21 ऑक्‍टोबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून, 24 ऑक्‍टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

अर्ज मागे घेणारे उमेदवार
काटोल विधानसभा
अनिल निळकंठराव देशमुख (अपक्ष)
सावनेर विधानसभा मतदारसंघातून अनुजा सुनील केदार (अपक्ष), खेमाजी परसराम बारापात्रे, (अपक्ष) नितीन मोहनदास राठी (अपक्ष)

हिंगणा विधानसभा
प्रा. डॉ. राजेंद्र जनार्दन कांबळे (अपक्ष)
उमरेड विधानसभा
देवीदास मन्साराम धारगावे (अपक्ष), नत्थू माधव लोखंडे (अपक्ष), राजेंद्र तुळशीराम मेश्राम (अपक्ष), विलास गणेश झोडापे (अपक्ष)

कामठी विधानसभा
सुलेमान अब्बास चिराग अली हैदरी (अपक्ष), गणेश बापुराव पाटील (अपक्ष), ज्ञानेश्‍वर पनालाल कंभाले (अपक्ष)

रामटेक विधानसभा मतदारसंघातून चंद्रपाल चौकसे (अपक्ष), रामेश्‍वर मंगल इनवाते (अपक्ष) व विशेष वसंता फुटाणे (अपक्ष)

नागपूर दक्षिण विधानसभा
योगेश कृष्णराव कुंभलकर (अपक्ष), मंगलमूर्ती रामकृष्ण सोनकुसरे (अपक्ष), राजकुमार भाऊराव नागुलवार (अपक्ष)

नागपूर पूर्व विधानसभा
आभा विजयकुमार पांडे (अपक्ष), दुनेश्‍वर सूर्यभान पेठे (अपक्ष), सुनील भीमराव इंगळे (वंचित बहुजन आघाडी), रोशन गांधीराम साहू (राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी)

नागपूर मध्य विधानसभा
प्रफुल्ल हेमराज बोकडे (अपक्ष), यशवंत नारायण बाजीराव (अपक्ष), रमेश पुणेकर (अपक्ष), विनोद इंगोले (अपक्ष)

नागपूर पश्‍चिम विधानसभा
प्रमोद लक्ष्मणराव नरड (अपक्ष), यशवंत प्रभाकर तेलंग (अपक्ष), वीरसेन स्टीफन बारसे (अपक्ष)

नागपूर उत्तर विधानसभा
मनोज दशरथ सांगोळे (अपक्ष), विशाल दिगांबर गोंडाणे (अपक्ष), महेंद्र तुलशीराम भांगे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

कामठी विधानसभा
सुलेमान अब्बास चिराग अली हैदरी (अपक्ष), गणेश बापुराव पाटील (अपक्ष), ज्ञानेश्‍वर पनालाल कंभाले (अपक्ष)

नागपूर दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are 146 candidates in the district