प्रशासन अ‍ॅलर्ट : राज्यात हिवताप जंतूंच्या दोनच जाती

प्रशासन अ‍ॅलर्ट : राज्यात हिवताप जंतूंच्या दोनच जाती

यवतमाळ : जून महिन्यात पावसाळा सुरू होताच या कालावधीत हिवताप, डेंगी व इतर कीटकजन्य आजार डोके वर काढतात. हिवताप टाळण्यासाठी प्रशासन अ‍ॅलर्ट मोडवर (Administration Alert mode) आले असून, आरोग्य कर्मचाऱ्‍यांद्वारे सर्वेक्षण (Survey by staff) करण्यात येत आहे. राज्यात हिवताप जंतूंच्या दोनच जाती आहेत. त्यामुळे या जंतूंपासून होणाऱ्या हिवतापाची काळजी घेणे आवश्‍यक (Care must be taken) आहे. (There-are-only-two-strains-of-malaria-in-the-state)

हिवतापाचा प्रसार अ‍ॅनाफिलिस डासांच्या मादीपासून होतो; तर लागण परोपजीवी जंतूमुळे होते. हिवताप जंतूंच्या एकूण चार जाती असल्या, तरी राज्यात प्लाझ्मोडीयम व्हायव्हॅक्स व प्लाझाडियम फॅल्सिीपेरम या दोनच जाती प्रामुख्याने आढळतात. हिवताप व इतर कीटकजन्य आजारांना डासांची उत्पत्ती कारणीभूत आहे. पाण्याचे साचलेले डबके, घरोघरी साचवून ठेवलेले वाराचे पाणी, निरुपयोगी टायर्स, भंगार साहित्य आदींमध्ये डासांची उत्पत्ती होते.

प्रशासन अ‍ॅलर्ट : राज्यात हिवताप जंतूंच्या दोनच जाती
शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

हिवतापाला आळा घालण्यासाठी डासांची उत्पत्ती रोखणे हाच एकमेव उपाय आहे. शासनस्तरावर हिवतापाला आळा घालण्यासाठी गाव, पाडे, वस्त्या आदी ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्‍यांकडून ताप रुग्ण सर्वेक्षण, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, गप्पी मासे सोडणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सहायक संचालकांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आशांना गप्पी मासे सोडणे, खासगी रुग्णालयातील ताप रुग्णाचे रक्त नमुने गोळा करणे आदी उपाययोजना घेण्यात येत आहेत. जोखमी पीएचसी केंद्रांवर आशांना कीटकजन्य आजार व प्रतिबंधबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

प्रशासन अ‍ॅलर्ट : राज्यात हिवताप जंतूंच्या दोनच जाती
वडिलांकडे हट्ट धरून काम करा; नवनीत राणांनी कशासाठी लिहिले पत्र
कीटक समाहरकमार्फत गावात रॅण्डमली कीटकशास्त्रीय अभ्यास सर्वेक्षण करून आवश्यक तेथे संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कोणताही ताप हिवताप असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले पाहिजे. घरी येणाऱ्‍या आरोग्य कर्मचाऱ्‍याकडे रक्ताचा नमुना द्यावा. तपासणीअंती दूषित आढळून आल्यास संपूर्ण उपचार घ्यावा.
- डॉ. विजय आकोलकर, जिल्हा हिवताप अधिकारी, यवतमाळ

(There-are-only-two-strains-of-malaria-in-the-state)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com