बोडखा गावाला ग्रामसेवकाचे ग्रहण

पंजाबराव ठाकरे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सभा नाहीत वसुली थकीत आहे. अशाने ग्रामविकासाचे स्वप्न कसे पूर्ण होणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

संग्रामपूर(बुलढाणा) - तालुक्यातील बोडखा गावाला एक महिन्यापासून ग्रामसेवक नसल्याने विकासकामे रखडली आहेत. गटविकास अधिकारी यांनी तीन ग्राम सेववकांच्या नियुक्त्या करूनही चार्ज घेण्यास कुणीच तयार नसल्याने ग्रामसेवक देता का ग्रामसेवक अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थावर आली आहे. याच मागणीसाठी सरपंचाला उपोषण करण्याचा इशाराही द्यावा लागला यालाच गतिमान प्रशासन म्हणावे काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

बोडखा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक टाक दोन महिने पूर्वी लाच घेताना पकडले होते. त्याचे विरुद्ध गुन्हाही दाखल आहे.त्या कारणावरून त्याची येथून बदली झाली. तेव्हापासून या ग्रामपंचायत ला ग्रामसेवक देण्यात आले नाही. या संदर्भात नव्याने निवड झालेले सरपंच यानी पंचायत समितीकडे वारंवार मागणी करूनही व गटविकास अधिकारी यांनी तीन ग्रामसेवकाच्या नियुक्त्या करूनही कुणीही पदभार घेतला नाही. यामुळे मार्च महिन्या मध्ये निधी आनी खर्च याचा ताळमेळ नाही.घरकुल आणि इतर कामाचे नियोजन नाही. सभा नाहीत वसुली थकीत आहे. अशाने ग्रामविकासाचे स्वप्न कसे पूर्ण होणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर संग्रामपूर पंचायत समिती मध्ये पनिशमेंटचे डेपो झाल्याचे उत्तर देऊन खुद्द गटविकास अधिकारी यांनी स्वतःची समस्या या गावाचे ग्रामपंचायतचे पदाधिकारी याचे समोर मांडली. म्हणूनच ग्रामसेवक वरिष्टाचे ऐकत नसावेत असेच यातून दिसून येते. महिना होऊनही गावा साठी ग्रामसेवक मिळत नाही तेही डिजिटल इंडिया चे काळात.

Web Title: There is no gramsebvak in bokhada buldhana