बाजार समित्यांमध्ये शेतमालाला हमीभाव नाही; तालुकानिहाय बदलतात दर

अनुप ताले
गुरुवार, 12 एप्रिल 2018

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कोणत्याच शेतमाला हमीभाव मिळत नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

अकोला - दुष्काळ तसेच बदलत्या वातावरणात पिकांवर कीडी, रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत वर्षभरात जिल्ह्यातील कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कोणत्याच शेतमाला हमीभाव मिळत नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. जे भाव मिळतात, त्यातही तालुकानिहाय मोठी तफावत आढळून येत असल्याने, शेतकरी हतबल झाले आहेत.

अनेक वर्षापासून पाण्याचा ओला, कोरडा दुष्काळ, हवामानातील वेळोवेळी होत असलेले बदल, त्यामुळे बोंडअळी, तुडतुडे, शेंगमाशी आदी कीडींचा प्रादुर्भाव, विषाणू, जीवाणूजन्य रोगांची लागण, यामुळे शेती उत्पादनाच्या सरासरीत दरवर्षी घट होत आहे. त्यातही शासनाचे शेतीविषयक धोरणे शेतकऱ्यांसाठी अधिक नुकसानाची ठरत असल्याचे आरोप शेतकरी व शेतकरी संघटनांकडून सातत्याने होत आहेत. भ्रष्टाचारावर रोख लावण्याहेतूने शेतकऱ्यांसाठी सर्व योजना आॅनलाइन केल्यामुळे शेतकरी शेतात कमी आणि आॅनलाइन केंद्रांवरील रांगेत अधिक दिसून येतात. शासनाच्या अनेक निकषांमध्ये हजारो शेतकरी बाद झाले, त्यामुळे अनेकांना कर्जमाफीही नाही अन् बँकांकडून नवीन कर्जही मिळाले नाही. अशा बिकट परिस्थितीत शेतमालाला किमान हमीभाव, तरी मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, वर्षभर जिल्ह्यातील कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कोणत्याच शेतमालाला हमीभाव दिला नसून, प्रत्येक तालुक्यात एकापेक्षा एक कमी दर देऊन शेतमाल खरेदी करण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र आहे.

शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समित्या व ११ एप्रिलपर्यंतचे सरासरी दर (प्रति क्विंटल) हमीभाव -

Agriculture

बाजार समित्यांमध्ये व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करत असतील, तर त्यांचेवर कारवाई करण्याचे अधिकार बाजार समित्यांना तसेच जिल्हा उपनिबंधकांकडे आहेत. जिल्हाभरात सऱ्हासपणे शेतकऱ्यांची लूट होत आहे परंतु, अाजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही. उलट शेतकऱ्यांचा माला खरेदी करून त्यांचे हित जोपासत असल्याचे सांगितले जाते. शासनाने याविषयी योग्य धोरण आखून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
- डॉ. प्रकाश मानकर, भारत कृषक समाज, महाराष्ट्र

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There is no price for the Agriculture commodities in market committees