जंतानाशक गोळया वाटपाचा फार्स; मागोवा घेणारी यंत्रणाच नाही 

There is no trace mechanism for worm killer pills in akola
There is no trace mechanism for worm killer pills in akola

अकोला : राज्यभरात दरवर्षी जागतिक जंतनाशक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या स्तरावरून बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येतात. मात्र हा कार्यक्रम झाल्यावर सदर कार्यक्रमाचा मागोवा आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून घेतला जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. त्यामुळे दरवर्षी केवळ गोळ्या वाटपाची औपचारिकताच पूर्ण केली जात असल्याचे वास्तव आहे. 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात २९ टक्के आढळून आले आहे. त्याच अनुषंगाने राज्यात ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ राबविण्यात येतो. जंतनाशक मोहिमेमुळे बालकांमधील रक्ताक्षय, अशक्तपणा व कुपोषणावर नियंत्रण तसेच बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास होण्यासाठी प्रयत्न केले जातात. कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय जंतांनाशक दिन साजरा करण्यात येतो.

या उपक्रमात राज्यातील वय वर्ष १ ते १९ वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळी दिली जाते. आरोग्य विभागाकडून हा कार्यक्रम प्रभावीपणे जरी राबविला जात असला, तरी गोळा वाटप केल्यानंतर किती बालके जंताच्या आजारापासून मुक्त झाली, यासंदर्भातील ठोस संशोधन मांडण्याचा प्रयत्न, या मोहिमेचा मागोवा आरोग्य विभागाकडून घेतल्या जात नसल्याने गोळ्या वाटपाची केवळ आैपचारिकता पूर्ण केली जात आहे. या गंभीर बाबीकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

दोन टप्यात गोळ्यांचे वाटप -
दरवर्षी जंतनाशक दिनाच्या अनुषंगाने राज्यभरात बालकांना गोळ्यांचे वाटप केले जाते. जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा शल्य चिकित्सक यांना गोळ्यांचे उदिष्ट देण्यात येतो. यामध्ये अकोला जिल्ह्यात ४ लाख ५० हजार ६१७, बुलडाणा ६ लाख आणि अमरावती जिल्ह्याला ५ लाख २६ हजार ७६७ गोळ्या वाटपाचे उदिष्ट होतो. गोळ्या वाटपानंतर किती मुलांची जंतापासून मुक्तता झाली यासंदर्भातील माहिती आरोग्य विभागाकडे नसल्याची वस्तुस्थिती आहे. 
 
दरवर्षी जंतनाशक दिनानिमित्तं गोळ्यांचे वाटप प्रभावीपणे आरोग्य विभागाकडून करण्यात येते. मोहिमेचा मागोवा, पडताळणी आमच्या स्तरावरून घेतली जात नाही. 
-रियाज फारूकी, आरोग्य उपसंचालक, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com