शेतकऱ्यांनो सावधान! यंदाही आहे कपाशीला गुलाबी बोंडअळीचा धोका

Bond Ali
Bond Ali

अमरावती ः खरिपातील कपाशी पीक फुलोर व बोंडी धरण्याच्या अवस्थेत असून यंदाही कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता कृषी विभागाने वर्तविली आहे. काही भागात असा प्रादुर्भाव दिसून आला असून शेतकऱ्यांनी फवारणी व इतर उपाययोजना काय व कशा कराव्यात याबद्दल कृषी विभाग, प्रादेशिक संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्राने मार्गदर्शन केले आहे. 

जिल्ह्यात कपाशी पिकाखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकाची परिस्थिती चांगली आहे. गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्याकरिता प्रती हेक्‍टरी ५ फेरोमन ट्रॅपचा वापर करणे, लाइट ट्रॅप लावणे, निंबोळी अर्काची फवारणी करणे, वेळीच डोमकळी नष्ट करणे तसेच शिफारशीप्रमाणे कीटकनाशकांचा वापर करणे इत्यादी उपाययोजना कराव्यात.

फवारणी करताना शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करताना कृषी विभागाने शेतकऱ्यांनी परवानाधारक दुकानातूनच कीटकनाशके खरेदी करण्यास व खरेदीचे पक्के बिल घेण्यास सांगितले आहे. फवारणी सलग दिवस सतत करू नये व ती उपाशीपोटी करून नये. सकाळी व संध्याकाळीच हवेच्या दिशेने करावी. 

आजारी किंवा जखम असलेल्या शेतकरी किंवा शेतमजुराने फवारणी करू नये. संरक्षण किटचा वापर करूनच कीटकनाशकांची फवारणी करावी. विषबाधा झाल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी जावे, असे आवाहन  जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी ल. ग. आडे यांनी सर्व शेतकरी व शेतमजुरांना केले आहे.
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com