'बापूंच्या हत्येमागे सावरकरच'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

जलालखेडा : न्यायालयात योग्य पुराव्याअभावी सावरकर यांची निर्दोष सुटका झाली असली, तरी बापूंच्या हत्येमागे सावरकरच होते, हे मी अभ्यासपूर्वक सांगतो. गांधी हत्येची सुरुवात ही स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच झाली होती, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महात्मा गांधी याचे पणतू तुषार गांधी यांनी केला. 

ते काटोल येथे काटोल विचारमंचतर्फे आयोजित व्याख्यानात बोलत होते. या वेळी मंचावर विचारमंचाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांच्यासह डॉ. गोविंद भुतडा, जवाहरलाल चांडक, कमलाकर देव, विनायक राऊत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

देशाची फाळणी, पाकिस्तानला 55 कोटी देणे, गांधी हे मुसलमानांचा भाग घेऊन हिंदूविरोधी होते, अशी कारणे देऊन गांधी हत्या ही हत्या नसून वध होता, असे सांगणाऱ्यांनी त्यांची बदनामी केली. परंतु, हत्या करणारा नत्थुराम गोडसे हा देशभक्त होता आणि गांधी देशविरोधी होते, हे दाखविण्यासाठी वरील दाखले दिले जातात. खरे पाहता गोडसे याने गांधींची हत्या करण्याचे प्रयत्न स्वातंत्र मिळण्यापूर्वीच दोनवेळा केले होते. त्यातील एक प्रयत्न तर वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाच्या समोर करण्यात आला होता. याचे पुरावे आहेत. गोडसे याला गांधींची हत्या करण्यासाठी अगोदर सुपारी देण्यात आली होती, असे तुषार गांधी म्हणाले. 

देशाच्या फाळणीत बापूंचा कुठेच सहभाग नव्हता. त्यांच्यावर आरोप करणाऱ्या हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बापूंचा फाळणीत सहभाग होता, याचा एक तरी पुरावा द्यावा, असे आव्हान या वेळी तुषार गांधी यांनी दिले. 
 
Web Title: There is Savarkar behind Mahatma Gandhi s Murder