युतीसंदर्भात अद्यापही सेनेशी चर्चा नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

नागपूर : शिवसेनेसोबत युती व्हावी, अशी भाजपची इच्छा आहे. शिवसेनाप्रमुख यांनीसुद्धा पंढरपूर येथे युतीचा निर्णय जनता घेईल, असे सांगितले. युती व्हावी ही जनतेचीच इच्छा असल्याचे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून अद्याप कोणतीही चर्चा सुरू झालेली नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा संघटनात्मक आढावा घेण्याचे काम सुरू आहे. आज नागपूर व भंडारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आतापर्यंत 35 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्याचे सांगितले.

शिवसेना व भाजपची युती व्हावी, ही जनतेची इच्छा असल्याचे सांगून ते म्हणाले की, समविचारी पक्षांशी युती व्हावी, ही भाजपच्या नेतृत्वाची पहिलेपासून इच्छा आहे. त्यानुसार येत्या काळात युतीबाबत चर्चा होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने लोकसभेच्या 3 जागा जास्त मागितल्या काय, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता अद्यापही युतीबाबत चर्चाच सुरू झालेली नसल्याने हा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरकारवर कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून टीका करीत आहे, याकडे त्यांची लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आतापर्यंत 90 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा फायदा मिळेल, असा दावा त्यांनी केला. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी नाराज असल्याचा आरोप शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे, याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, मी यासंदर्भात वर्तमानपत्रात वाचले आहे. त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 2 रुपये प्रतिकिलो दराने धान्यवाटप सुरू करण्यात आले आहे. जेणेकरून आत्महत्या करू नये, या योजनेमागची संकल्पना आहे. या वेळी नागपूर शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, माध्यम समन्वयक चंदन गोस्वामी उपस्थित होते.

Web Title: There is still no discussion with the Sena about the alliance