एमआयडीसीत अग्नितांडव; साेयाबिन, तुर आणि कापूस जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

प्राप्त माहितीनुसार, औद्याेगिक वसाहतमधील कुंभारी राेडवर हेडा गाेडाऊन असून, गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली. काही वेळेतच आगीने रौद्र रुप धारण केले व पाहता पाहता गाेडाऊन मधील साेयाबिन, तुर आणि कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्यात.

अकाेला - औद्याेगिक वसाहतीतील बाभुळगाव कुंभारी राेडवर हेडा गाेडाऊनला गुरुवारी (ता. 26) सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली. आगीत काेट्यवधीचे साेयाबिन, तुर आणि कापूस जळून खाक झाले आहे. अग्निशमन विभागाने घटनास्थळी पाेहचून आग नियंत्रणात आणली. 

प्राप्त माहितीनुसार, औद्याेगिक वसाहतमधील कुंभारी राेडवर हेडा गाेडाऊन असून, गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली. काही वेळेतच आगीने रौद्र रुप धारण केले व पाहता पाहता गाेडाऊन मधील साेयाबिन, तुर आणि कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्यात. आग लागल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दाेन गाड्या घटनास्थळी पाेहाेचल्या. त्यानंतरही आगीवर नियंत्रण न आल्याने आणखी एक गाडी रवाना करण्यात आली. माेठ्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आले. या आगीत साेयाबिन, तुर आणि कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत जळालेल्या धान्य व कापसाची किंमत काेट्यवधीच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्याचे कारण अद्याप समाेर आले नाही.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There was a fire in MIDC in Akola