वर्षभरात 15 रेल्वे फाटक होणार बंद

file photo
file photo

नागपूर : देशभरातील दीड हजार रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. याअंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनमधील 54 फाटक बंद केले जाणार आहेत. त्यात नागपूर विभागातील 15 फाटकांचा समावेश आहे.
देशात होणाऱ्या एकूण रेल्वे अपघातांपैकी 40 टक्के अपघात रेल्वे फाटकांवर होतात. ही बाब लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने देशभरातील ब्रॉडगेज मार्गावरील मानवरहित रेल्वे फाटकांचा प्रश्‍न निकाली काढला. ब्रॉडगेज मार्गावर एकही मानवरहित रेल्वे क्रॉसिंग शिल्लक नाही. यापाठोपाठ रेल्वे कर्मचारी नियुक्त असणारे रेल्वे फाटकसुद्धा पर्यायी व्यवस्था निर्माण करून बंद केले जात आहेत. या उपाययोजनेमुळे अपघातांना आळा बसेल. सोबतच रेल्वे वाहतूक गतिमान होण्यासह हातभार लागणार आहे.
देशात गतवर्षी एक हजार 477 ठिकाणी उड्डाणपूल किंवा अंडरब्रिज उभारले. चालू वर्षात दीड हजार पुलांच्या निर्मितीचे लक्ष्य आहे. त्यातील 195 पुलांची कामे यापूर्वीच पूर्ण झाली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत असलेले 19 रेल्वे फाटक गत वर्षीपासून वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आले. त्यातील दहा ठिकाणी उड्डाणपूल, अंडरब्रीज किंवा सबवे तयार केले आहेत. दपूमरे नागपूर विभागातील 15 फाटकांसह बिलासपूर विभागातील 30, रायपूर विभागातील नऊ असे एकूण 54 रेल्वे फाटक चालू वर्षात बंद करण्याचे नियोजन केले आहे. या सर्व ठिकाणी 173 कोटींच्या खर्चातून पर्यायी व्यवस्थेची उभारणी केली जाणार आहे. मुंबई मुख्य मार्गावरील सर्व 193 रेल्वे फाटक पुढील चार वर्षांमध्ये पर्यायी उपाययोजनेसह बंद करण्याचे नियोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com