भीतीने पळाले अन्‌ नाल्यात बुडाले

file photo
file photo

नागपूर : पोलिसांनी धाड टाकल्याच्या भीतीतून जुगार खेळणाऱ्या दोघांनी थेट नाल्यात उडी घेतली, परंतु पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री बहादुरा गावाजवळील पांढूर्णा शिवारात ही दुर्दैवी घटना घडली.
शेख जावेद शेख इकबाल (22) रा. कब्रस्तानजवळ, हसनबाग आणि इरफन ऊर्फ सोनू शेख जिब्राईल शेख (30) रा. सरताज कॉलनी, मोठा ताजबाग अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, जावेदचा आठवडी बाजारांमध्ये विक्रेत्यांना बॅटरीवरील लाइट उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय होता, तर सोनू रेडिमेड कपड्यांचे दुकान लावायचा. आठवडी बाजाराशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसोबत त्यांची मैत्री आहे. शुक्रवारी बाजार बंद असल्याने मृत आणि त्यांच्या अन्य 10 ते 12 परिचितांनी एकत्र येत जुगार खेळण्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे ते बहादुरा जवळच्या नाल्याजवळ गेले. निर्जनस्थळी सर्वजण जुगार खेळत होते. सायंकाळी चार ते पाच जण त्यांच्या दिशेने येताना दिसले. ते पोलिसच असल्याची शंका आली. भीतीपोटी सर्वजण मिळेल त्या मार्गाने पळून जाऊ लागले. पाऊस नसल्याने नाल्यात पाणी कमी असेल आणि नाला ओलांडल्यास पोलिस पकडू शकणार नाहीत, असा जावेद आणि सोनूसह इतरांचाही समज झाला. त्यानुसार काहींनी नाल्यात उडी घेतली. अन्य कसेबसे बाहेर निघाले, पाणी फार जास्त नसले तरी गाळ आणि चिखलात अडकल्याने जावेद व सोनू पाण्यात बुडाले. इकडे पळून गेलेले मित्र रात्री पुन्हा एकत्र आले. पण, जावेद आणि सोनू बेपत्ताच असल्याने त्यांनी पुन्हा घटनास्थळी जाऊन बघितले. पण, उपयोग झाला नाही. नाल्यात उडी घेतल्यानंतर दोन युवक बेपत्ता झाल्याची माहिती शनिवारी सकाळी सक्करदरा पोलिसांना मिळाली. अग्निशमन दलाला पाचारण करीत पोलिसांनी नाल्यातच दोघांचा शोध सुरू केला. सकाळी 10 च्या सुमारास जावेदचा तर दुपारी 3 च्या सुमारास सोनूचा मृतदेह हाती लागला. सक्करदरा पोलिसांनी प्रकरणाची नोंद करीत तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com